राज्यात उद्यापासून चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, इनडोअर गेम अन् जलतरण तलाव सुरू

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले आहेत.
Maharashtra Government allows cinema halls, theatres, multiplexes to open from 5th November
Maharashtra Government allows cinema halls, theatres, multiplexes to open from 5th November

मुंबई : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकार पावले टाकत आहे. या अंतर्गत राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले आहेत. उद्यापासून (ता.5) राज्यातील चित्रपटगृहे आणि जलतरण तलाव सुरू होत आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध कायम राहणार आहेत. 

राज्यातील जलतरण तलाव उद्यापासून खुले होणार आहेत. असे असले तरी ते केवळ राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडापटूंना प्रशिक्षणासाठी खुले असतील. याबाबतची नियमावली क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाने जाहीर केली आहे. 
योगा इन्स्टिट्यूटही उद्यापासून सुरू होती. याबाबतची नियमावली सार्वजनिक आरोग्य विभागने जाहीर केली आहे.

याचबरोबर सर्व इनडोअर क्रीडा प्रकार बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोअर शूटिंग रेंज आदींना योग्य शारीरिक अंतर राखून आणि इतर उपाययोजनांसह उद्यापासून परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स यांना उद्यापासून 50 टक्के क्षमतेसह खुले राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र, ही परवानगी असणार नाही. 

केंद्र सरकारचे आस्ते कदम धोरण 

आगामी काळ सणासुदीचा असल्याने केंद्र सरकारने मात्र, लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी आस्ते कदम धोरण स्वीकारले आहे. केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाउन आणखी एक महिनाभर लांबवण्याच निर्णय 27 ऑक्टोबरला घेतला  होता. केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक-6 चे दिशानिर्देश जारी करताना मागील दिशानिर्देश यापुढेही चालू ठेवावेत, असे म्हटले होते. 

कोरोना उद्रेकाचे प्रमाण जास्त असलेल्या कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाउनची अंमलबजावणी 30 नोव्हेंबरपर्यंत कडकपणे करावी, अशी सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली होती. राज्ये व राज्यशासित प्रदेशांना कंटन्मेंट झोनच्या बाहेर लॉकडाउन लागू करता येणार नाही. यात राज्य, जिल्हा, उपविभाग, शहर आणि गाव पातळीवरील लॉकडाउनचा समावेश आहे. लॉकडाउन लागू करावयाचा झाल्यास आधी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. कंटन्मेंट झोनमध्ये मात्र, लॉकडाउन लागू राहील, असे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. 

देशभरात 10 राज्ये वगळता कोरोनाचा प्रार्दुभाव कमी कमी होत चालल्याचे सध्याच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. अमेरिका-युरोपमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेक देशांत पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. काही देशांनी निर्बंध लावलेही आहेत. 

या  पार्श्‍वभूमीवर कोणताही धोका स्वीकारण्याची केंद्र सरकारची तयारी नाही. विशेषतः ईद, दिवाळी, गुरू नानक जयंती, छट पूजा या सणासुदीच्या काळात कोरोनाविषयक आरोग्य नियमांचे पालन न होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच कोरोना दिशानिर्देश पुढच्या महिनाअखेरपर्यंत चालू ठेवण्यास केंद्र सरकारने सांगितले होते. मात्र, या काळात आंतरराज्य प्रवासी व मालवाहतुकीला कोणतेही बंधन नसेल. त्यासाठी संबंधित यंत्रणांच्या परवानग्या, अर्ज, वेगळे ई-पास आदींचीही आवश्‍यकता असणार नाही, असेही स्पष्ट केले होते.

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com