Maharashtra extends lock down till July 31 no more relaxation | Sarkarnama

लाॅकडाऊन आता 31 जुलैपर्यंत `जैसे थे` : रेल्वे, एसटी, बस, हाॅटेल माॅल, थिएटर बंदच!

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 29 जून 2020

लाॅकडाऊन महिनाभराने वाढविताना निर्बंधातून नवी सवलत देण्यात आलेली नाही. 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 31 जुलै पर्यंत लॉक डाऊन कायम ठेवण्यात आला आहे. "मिशन बिगीन अगेन"च्या दुसऱ्या टप्प्याला 1 जुलैपासून सुरुवात होणार आहे. राज्य सरकार टप्प्याटप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील करत आहेत. मागच्या आठवड्यात राज्यात सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नव्याने मात्र इतर कोणतीही शिथीलता देण्यात आलेली नाही. मिशन बिगिन अगेनच्या पहिल्या टप्प्यात ज्या अटी-शर्ती होत्या त्या कायम ठेवल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील एसटीसेवा, माॅल, हाॅटेल, थिएटर, बार आदी बंदच राहणार आहेत. दुकाने उघडे ठेवण्याची वेळही वाढविण्यात आलेली नाही. 

 -महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 जुलै रात्री 12 पर्यंत कायम असेल.

-अत्यावश्यक दुकाने आणि ऑन-इव्हन नियमानुसारची नियमावली कायम

-सरकारी आणि खासगी कार्यालयांची नियमावली ही कायम

-राज्यात 31 जुलैपर्यंत जिल्हाबंदी आणि एसटी सेवा ही बंद.

खालील परवानगी असणार

सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा असणार आहे.

केवळ इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नाही.

सामूहिक (ग्रुप) अॅक्टिविटीजना परवानगी नाही.

लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य असणार आहे.

केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी.

सायकलिंग करण्यास अधिक प्रोत्साहन, यातून शारीरिक व्यायामासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते.

प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत

विवाहसोहळ्यांना लाॅनमध्ये परवागनी अटींसह 50 व्यक्तींना परवानगी

अंत्यसंस्कारासाठी 50 व्यक्ती उपस्थित राहू शकतात. 

शैक्षणिक संस्थांत विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी शिकविण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जाऊ शकतात. 

गॅरेज सुरू करण्यास परवानगी पण वाहन दुरुस्तीसाठी वेळ घ्यावी लागेल 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख