अजितदादा, आश्वासन पूर्ण करणार का..मुनगंटीवार यांचा सवाल 

मुनगंटीवार म्हणाले की विदर्भ हे तर मुख्यमंत्र्यांचं आजोळ आहे. या विषयावर तर नातवानंपेटून उठलं पाहिजे.
sm1.jpg
sm1.jpg

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळाचा प्रश्न उपस्थित केला.

मुनगंटीवार म्हणाले की विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता राहते. वैधानिक महामंडळ करू असा शब्द दिला होता. 72 दिवस झाले तरी  वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना सरकार करीत नाही. अजित पवार आश्वासन पूर्ण करणार आहेत की नाहीत, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी विचारला.

मुनगंटीवार म्हणाले की विदर्भ हे तर मुख्यमंत्र्यांचं आजोळ आहे. या विषयावर तर नातवानं पेटून उठलं पाहिजे,  १० दिवसांचं अधिवेशन एकदम १० नंबरी झालं पाहिजे. 

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "हे वैधानिक विकास महामंडळ झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पण मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आहे की ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु. १० नंबरी काय आणि पुढचा कोणता नंबर लावा तसं अधिवेशन करु,” 

राज्यपालांनी केले अस्खलित मराठीत भाषण 

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनी एकमेंकांविरूद्ध घोषणाबाजी केली. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस नेत्यांकडून सायकल रॅली काढण्यात आली होती. रॅली विधानभवनाजवळ पोहोचताच काँग्रेस आणि भाजपा आमदारांनी घोषणाबाजी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अस्खलित मराठीत अभिभाषण केलं. 

"कोरोना काळात राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यात सध्या 500 प्रयोगशाळा कार्यरत आहे. कोरोनाविरूद्ध आजही लढा सुरू आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणात सांगितले. कोरोना योद्धाचे राज्यपालांनी आभार मानले.

"कोविडकाळात विशेष सर्वेक्षण करण्यात आली आहे. राज्याला केंद्र सरकारकडून 29 हजार कोटींचा जीएसटी परतावा येणे बाकी आहे. कोरोना काळात राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या.  शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई म्हणून आर्थिक तरतुद करण्यात आली आहे," असे राज्यपालांनी सांगितले.   
  
राज्यपाल म्हणाले की, सीमा भागातील रहिवाश्यांना न्याय मिळवून देण्यास माझं सरकार तयार आहे. कोविडची संख्या कमी करून धारावी येथे उत्तम काम माझ्या सरकारने केलं आहे कोविड या संसर्गजन्य साथीवर सरकार नियंत्रण मिळवत आहे. 35 टक्के महसूल यावर्षी कमी आहे. अडीच लाख शेतकऱ्याना 750 कोटी रुपयांचे अन्नधान्य पुरवलं आहे. शिवभोजन योजनेत 3 कोटी 15 लाख नागरिकांनाना लाभ मिळाला आहे.  
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com