धक्कादायक : राज्यात 39 ग्रामसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू...  - Maharashtra 39 Gram Sevaks die due to corona in the state | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

धक्कादायक : राज्यात 39 ग्रामसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू... 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

ग्रामसेवकांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

नगर :  राज्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या काळात काम करताना राज्यात ३९ ग्रामसेवकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या ग्रामसेवकांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे केली आहे. 

अत्यावश्यक सेवेत काम करत असल्याने ग्रामसेवकांना सरकारने ५० लाख रुपये विमा कवच दिलेले आहे.  महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना याबाबत निवेदन पाठविले आहे.  आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेवून मयत ग्रामसेवकांच्या कुटुंबातील पात्र वारसास विशेष बाब म्हणून जिल्हा परिषद सेवेत नोकरी देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पडळकरांनी गांजा घेऊन बिरोबाची खोटी शपथ घेतली होती का ? 

गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग आहे. या काळात गाव पातळीवर कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून केलल्या उपाययोजनांमध्ये ग्रामसेवकांवर मोठी जबाबदारी दिली. गेल्या वर्षभरात ग्रामसेवकांना राज्यभर काम केल्यामुळे बहूतांश ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव रोखण्याला यश आले. कोरोना काळात काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील फ्रंट लाईन वर्करला सरकारने पन्नास लाखाचे विमा कवच दिले आहे. या काळात मृत्यू झालेल्या काही विभागातील कर्मचाऱ्यांना मदतही दिली गेली आहे. 

मागील वर्षीही काही ग्रामसेवकांचा कर्तव्य बजावताना कोविड संसर्ग होवून दुर्देवी मृत्यु झाला. त्यापैकी सप्टेंबर ते डिसेंबर 2020 या कालावधीतील काहींचे विमा कवच प्रस्ताव प्रलंबित आहे. चालू वर्षीही ग्रामसेवक अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. काम करताना त्यांना संसर्ग होत आहे. जानेवारी ते 25 एप्रिल 2021 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील 3९ ग्रामसेवकांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यांचे प्रत्येकी 50 लाख विमा कवचाचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत, असे संघटनने सरकारला पाठविलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख