महादेव जानकरांचा रासप सर्व निवडणुका स्वबळावर लढणार : भाजपपासून दुरावल्याची चर्चा?  - Mahadev Jankar's RSP will contest all elections on its own: Discussion of separation from BJP? | Politics Marathi News - Sarkarnama

महादेव जानकरांचा रासप सर्व निवडणुका स्वबळावर लढणार : भाजपपासून दुरावल्याची चर्चा? 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

या निर्णयामुळे महादेव जानकर यांचा रासप हा भाजपपासून दुरावला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या महाआघाडीत असलेला राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) आगामी काळातील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा रासपचे नवे प्रदेशाध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली. या निर्णयामुळे महादेव जानकर यांचा रासप हा भाजपपासून दुरावला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

गुट्टे यांची शुक्रवारी (ता. 30) राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रासप राज्यातल्या सर्व निवडणुका लढेल, तसेच त्या स्बळावर लढवल्या जातील. पक्ष गावागावांत नेण्यासाठी नवे पदाधिकारी प्रयत्न करणार आहेत. तसेच, माझा पक्ष माझा परिवार, अशी मोहीमही आम्ही राबवणार आहोत. पक्षाची लवकरच कोअर कमिटी स्थापन केली जाईल, अशी माहिती आमदार गुट्टे यांनी दिली. 

बाळासाहेब दोडतले यांची प्रदेश महासचिवपदी तर गोविंदराव सुरनर, बाळासाहेब लंगर, पंडित धर्माजी घोळवे यांची राष्ट्रीय संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. 

या वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना निवडीची पत्रे देण्यात आली. पक्षाचे विधानसभेत रत्नाकर गुट्टे (गंगाखेड) आणि विधान परिषदेत महादेव जानकर असे दोन आमदार आहेत. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत रासप भाजपच्या महाआघाडीत आहे. महादेव जानकर हे पक्षाचे संस्थापक आहेत. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख