भगवी शाल अन् अंकाई किल्ल्यावर मुक्काम; जानकरांच्या मनात चाललंय काय?   - Mahadev Jankar two-day stay at Ankai fort | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

भगवी शाल अन् अंकाई किल्ल्यावर मुक्काम; जानकरांच्या मनात चाललंय काय?  

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 14 जून 2021

अंगावर भगवी शाल घेउन जानकार यांनी किल्ल्यावरील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला आहे.

मनमाड : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) सध्या मीडियापासून दुरच आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये दुग्धविकास मंत्रिपद भुषवलेले जानकर सध्या कुठेच दिसत नाहीत. अशातच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते भगवी शाल अंगावर घेउन अंकाई किल्ल्यावर फेरफटका मारताना दिसत आहेत. ते दोन दिवस किल्ल्यावर मुक्कामी असल्याचेही समजते.  (Mahadev Jankar two-day stay at Ankai fort)

हे ही वाचा : जळगावमध्ये संजय राऊतांच्या विधानाची ठिणगी!

महादेव जानकर यांनी मनमाडपासून जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावरील अगस्तीमुनींच्या आश्रमात 2 दिवस मुक्काम केला आहे. यावेळी त्यांनी किल्ल्यावर असलेले प्रभू रामचंद्र, ऋषी अगस्तीमुनींच्या मंदिर आणि मोठे बाबाच्या दरगाह इथे जाऊन दर्शन घेतले. शिवाय महंत ज्ञानगिरी महाराज यांच्यासोबत गप्पा मारून किल्ल्याची माहिती जाणून घेतली. 

महादेव जानकर यांनी त्यांच्या या मुक्कामाबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. त्यांनी मीडियाला आणि लोकांना भेटण्याचे देखील टाळले. अंगावर भगवी शाल घेउन जानकार यांनी किल्ल्यावरील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला आहे. अचानक ते या किल्ल्यावर दोन दिवस का थांबले. त्यांच्या मनात काय चालले. ते अस्वस्थ तर नाही ना? मनाला शांती मिळावी यासाठी ते या किल्ल्यावर आले होते का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हे ही वाचा : बीड जिल्ह्यात येणारा विकास निधी गावांपर्यंत जात नाही; क्षीरसागरांची ठाकरेंकडे तक्रार...

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. त्यानंतर महादेव जानकर हे भाजपच्या आंदोलनात सहभागी होताना दिसले नाहीत. दरम्यान, ते पंकजा मुंडे यांच्यासोबत दसरामेळाव्याला हजर होते. त्यानंतर आता अंकाई किल्ल्यावरचा त्यांचा व्हिडीओ समोर आला. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख