करंट्या राज्य सरकारमुळे पदवीधरांचे नुकसान..चंद्रकांतदादाचा हल्लाबोल... - Loss of graduates due to current state government Chandrakant Patil attack  | Politics Marathi News - Sarkarnama

करंट्या राज्य सरकारमुळे पदवीधरांचे नुकसान..चंद्रकांतदादाचा हल्लाबोल...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

"जनतेला वेठीस धरलेल्या राज्यातील करंट्या महाविकास आघाडी सरकारला पदवीधर आणि शिक्षक मतदार धडा शिकवतील," असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी  केला.

पिंपरी : "जनतेला वेठीस धरलेल्या राज्यातील करंट्या महाविकास आघाडी सरकारला पदवीधर आणि शिक्षक मतदार धडा शिकवतील," असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पिंपरी चिंचवडमध्ये केला. पदवीधरांचे नुकसान केलेल्या या सरकारविरुद्ध हे पदवीधर आणि शिक्षक मतदार यावेळी रोष व्यक्त करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. ''करंट्या राज्य सरकारमुळे पदवीधरांचे जे नुकसान झाले आहे,'' असे ते म्हणाले.

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ चंद्रकांत पाटील यांनी शहराचा दौरा केला. सात मोठ्या शैक्षणिक संस्थांना त्यांनी भेटी दिल्या. पक्षाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस नगरसेवक मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे आदी या दौऱ्यात सहभागी झाले होते.

पिंपरी-चिंचवड प्राधिकरणमधील ज्ञान प्रबोधिनी नवघर विद्यालयातील शिक्षक मतदारांशी चंद्रकांतदादांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी या निवडणुकीत मतदानासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. भावी पदवीधर मतदार असलेल्या पिंपरी-चिंचवड एज्युकेशन सोसायटीच्या (PCCOE) विद्यार्थ्यांसमोरही त्यांनी भाषण केले. त्यात त्यांनी करंट्या राज्य सरकारमुळे पदवीधरांचे जे नुकसान झाले आहे, त्यावर राज्यातील मतदार पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या निमित्ताने आपला रोष व्यक्त करतील, असे सांगितले. 

हेही वाचा :  भाजपचा प्रचाराचा धडाका...राष्ट्रवादीत, मात्र शांतताच... 
पिंपरी : पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक प्रचारासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपने प्रचाराची राळ उडवून दिली आहे. मतदारसंघातील उमेदवार सांगलीचा असला, तरी तो जणू काही शहरातीलच असे समजून शहर भाजपने प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले असून प्रचार बैठकांचा धडाका लावला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गोटात म्हणावी तेवढी लगबग दिसून आलेली नाही. त्यांचा एकही मोठा नेता शहरात अद्याप आलेला नसून त्यांचे एकमेव आमदारही या प्रचारात तेवढे सक्रिय आढळलेले नाहीत. भाजपचे शहरातील दोन्ही आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप हे स्वतः तर जोरात कामाला लागले आहेत मतदान बाद होऊ नये, याचा व्हिडिओ सुद्धा तयार केला गेला आहे. शहरातील शिक्षण संस्था, त्यांचे प्रमुख, तेथील मतदार शिक्षक, पदवीधर यांच्या बैठका खुद्द चंद्रकांत पाटील यांनी घेतल्या आहेत.
 (Edited  by : Mangesh Mahale) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख