केंद्र सरकारच्या पत्रानंतरच राणे कुटुंबीयांवर कारवाई; राज्य सरकारचा खुलासा

नीलम राणे व पुत्र आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे.
Look out circular issued against Nitesh Rane after central govt letter
Look out circular issued against Nitesh Rane after central govt letter

पुणे : कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या पत्नी नीलम राणे (Neelam Rane) व पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. पोलिसांनी केलेली ही कारवाई केंद्र सरकारच्या पत्रानंतरच झाल्याचं आता समोर आलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. (Look out circular issued against Nitesh Rane after central govt letter)

राणे कुटुंबीयांना लुकआऊट नोटीस जारी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना वळसे-पाटील म्हणाले, राणे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी कर्जाची परतफेड ने केल्याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे पत्र केंद्र सरकारच्या गृह विभागानंच  राज्य शासनास पाठवलं होतं. या प्रकरणाची सत्यता पडताळणी केल्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे, असं वळसे पाटील यांनी सांगितलं.

डीएचएफएल कर्ज प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. नितेश राणे व नीलम राणे यांनी 65 कोटी रुपयांचं कर्ज थकवल्याची तक्रार पोलिसांकडं आली आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीनं ही तक्रार दिली आहे. पंचवीस कोटींचे कर्ज घेतलेल्या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रा. लि. या कंपनीच्या नीलम राणे या सह अर्जदार होत्या. 

आर्टलाईनकडून कर्जाची परतफेड करण्यात आली नसल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. तसेच नीलम हॉटोल्स प्रा. लि. या कंपनीने 40 तोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्याचीही 34 कोटी रुपयांची थकबाकी आहे. पुणे पोलिसांनी तीन सप्टेंबर रोजी लुकआऊट नोटीस बजावल्याचे समजते. न्यायालायच्या आदेशानुसार ही नोटीस काढण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

दरम्यान, राणे यांच्या मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केलं. त्यानंतर राणे यांना अटक करण्यात आली. यावरून भाजपनं ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. ही कारवाई सूडबुध्दीने करण्यात आल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. जामीन मिळाल्यानंतर राणे यांनी दुसऱ्या दिवसापासून पुन्हा एकदा मुख्यमंत्री व शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. 

त्यातच आता राणे कुटूंबातील दोघांना लुकआऊट नोटीस बजावण्यात आल्यानं पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून ठाकरे सरकारव टीका केली आहे. ही कारवाई राजकीय सूडबुध्दीने केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com