राष्ट्रवादी काँग्रेस तयार करणार पक्षाची भूमिका मांडणारे कार्यकर्ते.. - on the line of bjp now ncp has speaker camp in every district. | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस तयार करणार पक्षाची भूमिका मांडणारे कार्यकर्ते..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही पक्ष बांधणी सुरू केली आहे.  प्रत्येक जिल्ह्यात वक्ता शिबीर आयोजित करण्यात येत आहे.

जळगाव : संघटन मजबूत करण्यासह चांगले वक्तृत्व करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावे, यासाठी भाजपतर्फे प्रत्येक जिल्ह्यात शिबीर आयोजन करण्यात येते, त्यातून चांगल्या कार्यकर्त्यांना जिल्हा, प्रदेश स्तरावर संधी दिली जाते. अगदी त्याच धर्तीवर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही पक्ष बांधणी सुरू केली आहे. पक्षात चांगले बोलणारे वक्ते तयार व्हावेत, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वक्ता शिबीर आयोजित करण्यात येत आहे. त्यातील पहिले शिबीर काल जळगाव जिल्ह्यातील चांदसर येथे घेण्यात आले.

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच यात काय साम्य असेल तर ते आहे  कार्यकर्ता घडविण्यासाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे सत्तेत असो किंवा विरोधात असो नेहमी अशी शिबीर घेण्यात येत असतात. त्या माध्यमातून चांगल्या कार्यकर्त्यांचा शोध घेवून त्यांना पुढे संधी देण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात प्रथमच युवती शिबीर घेतली होती, या माध्यमातून त्यांनी अनेक युवतीना व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. या शिवाय पक्षातर्फे युवकासाठीही विविध शिबीर घेण्यात येत आले होते.

पक्षातर्फे संघटन मजबूत करण्यासाठी चांगले वक्तृत्व करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावे, यासाठी वक्ता शिबीर राज्यभरात आयोजित करण्यात येत आहे. जळगाव जिल्हयातील चांदसर येथेही या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख व प्रदेश उपाध्यक्ष संजय पवार यांनी या शिबीराचे आयोजन केले होते. प्रदेश प्रवक्ता प्रदीप सोळुंके, विकास लंवादे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाची बाजू वक्त्यांची कशी मांडावी, विरोधकांना कसे उत्तर द्यावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. 

विशेष सकाळी दहा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत हे शिबीर घेण्यात आले. पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वक्ता शिबीराबाबत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व मार्गदर्शक प्रदीप सोळुंके म्हणाले कि सत्ता आल्यानंतर पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष होत असते, २०१४ च्या अगोदर  पक्षाचे फार मोठे नुकसान झालेले आहे. सत्ता आल्यानतंरही पक्षबांधणीकडे दुर्लक्ष होवू नये हा पक्षाच्या वतीने प्रयत्न  आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात व विधानसभा मतदार संघात पक्षाची भूमिका मांडणारे कार्यकर्ते आणि वक्ते तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख