किरीट सोमय्यांचा बाण योग्य ठिकाणी; प्रताप सरनाईक घायकुतीला    

भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल.
 Kirit Somaiya, Pratap Saranaik .jpg
Kirit Somaiya, Pratap Saranaik .jpg

मुंबई : ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पत्र लिहिल आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी सरनाईक यांच्यावर विविध आरोप करत त्यांना घायकुतीला आणले. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी ईडीकडुन सुरु आहे. त्याचा पाठपुरावाही सोमय्या यांनी केला. त्यामुळे सोमय्यांचा बाण योग्य ठिकाणी लागला असल्याची चर्चा राज्यभरात रंगली आहे.  (Letter written by Pratap Saranaik to Chief Minister Uddhav Thackeray goes viral) 

किरीट सोमय्या यांनी विविध आरोप करत शिवसेना नेत्यांना जेरीस आणले आहे. प्रताप सरनाईक, (Pratap Saranaik) राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, आमदार  रविंद्र वायकर, यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप केले आहेत. सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, सरनाईक यांनी ठाकरे यांना दोन पानी पत्र लिहून महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, परब, वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास थांबेल, असे त्यांनी म्हटले आहे.  

दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक  Pratap Saranaik हे बेपत्ता असल्याची तक्रार शनिवारी भाजपकडून वर्तकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. "आमदार झाले Mr.india" असे बॅनर घेऊन भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. प्रताप सरनाईक सध्या मातोश्रीवर असल्याचा आरोप यावेळी भाजपने केला होता. सरनाईक हे गेल्या १०० दिवसांपासून बेपत्ता असल्याचे भाजपने म्हटेल होते. या पार्श्वभूमीवर भाजपने ठाणे येथील वर्तकनगरमध्ये आंदोलन केले. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे आणि ५० रहिवाशांनी मानवी साखळी करुन आंदोलन केले होते. (Letter written by Pratap Saranaik to Chief Minister Uddhav Thackeray goes viral) 

ओवळा माजीवडा मतदारसंघाचे आमदार कुठल्याही प्रकारची मदत करीत असताना दिसत नाही. ते जवळपास शंभर दिवसापासून बेपत्ता आहे. ते कुठे हरवले आहेत, असा उगाच संशय येत आहे. त्यांना कुणी गायब केले आहे का? याचा तपास करुन सरनाईक यांचा शोध घ्यावा," अशी मागणी तक्रारीमध्ये करण्यात आली होती. मिलिंद नईबागकर आणि हरीष जोशी यांनी वर्तकनगर पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अनेक दिवस बेपत्ता असलेले सरनाईक मतदार संघात अवतरले होते. 

मुंबई महानगर प्राधिकराणाचे तब्बल शंभर कोटी रुपये ढापल्याचा आरोप सोमय्या यांनी सरनाईक यांच्यावर केला होता. त्यातून लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचेही आरोप त्यांनी केले होते. सरनाईक यांची ईडीमार्फत असलेली चौकशी रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

सोमय्या यांनी टाॅप सिक्यरिटीजने हा घोटाळा केल्याचे सांगितले होते. तसेच सरनाईक यांची ईडी करत असलेली चौकशी ही मुंबई पोलिसांनी  दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे होत असल्याचा दावा केला होते. सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अमित चांदोळे यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. ईडीने सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते.     

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in