मातंग समाजाला विधानपरिषदेत संधी देण्यासाठी शरद पवार यांना पत्र.. 

डॉ मिलिंद आवाड हे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. मराठवाड्यात उपेक्षितांचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ आवाड यांचे ते सुपूत्र आहेत.
MA.
MA.

पुणे : आजपर्यंतच्या ७० वर्षांच्या संसदीय इतिहासात मातंग समाजाला एकदाही विधानपरिषदेवर संधी मिळालेली नाही. समाज नेहमीच आपल्या पक्षीय विचारधारेशी एकनिष्ठ आहे.पण आजवर विधानपरिषदेवर संधी मिळालेली नाही. यावर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष आहे, किमान यावेळी मातंग समाजातील उच्चविद्याविभूषित नेतृत्व डॉ. मिलिंद आवाड यांना विधानपरिषदेवर संधी देउन समाजाला न्याय द्यावा," अशी मागणी दलित युवक आंदोलनाचे संस्थापक सचिन बगाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे.

डॉ मिलिंद आवाड हे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. मराठवाड्यात उपेक्षितांचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ आवाड यांचे ते सुपूत्र आहेत. एकनाथ आवाड यांनी सातत्याने उपेक्षित माणसांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून लोकांना उभे केले. त्यांना लढाऊ बनवले. 'जग बदल घालून घाव' हे त्यांचे आत्मकथन प्रसिध्द आहे. एकनाथ आवाड यांचा लढाऊ वारसा प्रा मिलिंद आवाड चालवत आहेत.

2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीचे निमंत्रित सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 2019 मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी मराठवाड्यातील अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला. मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून जोडलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी डॉ. आव्हाड यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली.

"प्रा मिलिंद आवाड यांना विधानपरिषदेच्या सभागृहात संधी देऊन त्यांच्या विद्वत्तेचा सन्मान करावा. विधानपरिषद स्थापन झाल्यापासून मातंग समाजाला या सभागृहात एकदाही संधी मिळालेली नाही.समाज नेहमीच आपल्या सोबत राहिला आहे. समाजातील लोकांना आपल्याबद्दल प्रेम वाटते. आपल्या राजकीय वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावर मातंग समाजाने खंबीर साथ दिलेली आहे. हे वर्ष लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षाच्या निमित्ताने प्रा. मिलिंद आवाड यांच्यासारख्या सामाजिक चळवळीची पाश्वभूमी असलेल्या आणि नेहमीच आपल्यासोबत राहून आपल्या राजकीय भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या एकनाथ आवाड (जिजा) यांच्या वारसदाराला विधानपरिषदेवर संधी द्यावी," असे सचिन बगाडे यांनी शरद पवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा : राज ठाकरे यांच्या घरात पोहचला कोरोना... 


मुंबई : लॅाकडाउन शिथिल केल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना आता राजकीय व्यक्तीच्या घरापर्यंत पोहचला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरात काम करणाऱ्या दोन जणांचा कोराना तपासणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. याआधी राज ठाकरे यांच्या दोन वाहन चालक, दोन सुरक्षा रक्षकांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे.  या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरात काम करणारे कर्मचारी काळजी घेत होते. ठाकरे कुंटुबियांनी देखील बाहेर जाणे टाळलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com