भारत माता की बात करते है ! झूठ बोलते है ! राहुलबाबांचा मोदींवर हल्लाबोल  - Let's talk about Mother India! Lie! Rahul Baba attacks Modi | Politics Marathi News - Sarkarnama

भारत माता की बात करते है ! झूठ बोलते है ! राहुलबाबांचा मोदींवर हल्लाबोल 

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

चीनने भारताची जमीन लाटली आहे. हे सत्य असूनही आपली इमेज जपण्यासाठी देशाला ते खोटं बोलत आहेत.

पतियाला (पंजाब) : "" हाथरसमध्ये ज्या दलित पीडित युवतीवर बलात्कार झाला, हत्या झाली तिचे नातेवाईक एकटे नाहीत. आम्हीही तुमच्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी ती तेथे गेलो होतो. यूपी प्रशासनाने या पीडितेच्या कुटुबीयांना लक्ष्य केले. परंतू आपले पंतप्रधान एक शब्दही बोलले नाहीत असा शब्दात कॉंग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. 

मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाला पंजाब, हरियाणासह देशातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंजाबमध्ये तीन दिवस शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टर रॅलीचे आयोजन केले होते. या आंदोलनात गेल्या तीन दिवसापासून राहुल सहभागी झाले होते. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. 

आज पतियालात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यूपीतील हाथरसप्रकरण, भारताची चीनने लाटलेली जमीन, कृषी विधेयक, देशातील बेरोजगारी, ठप्प उद्योगधंदे आदी मुद्यावर त्यांनी मोदी सरकार आणि यूपीतील योगी सरकारवर सहकून टीका केली.

ते म्हणाले, की खरे तर मी हाथरसमध्ये गेलो होतो ते पीडित युवतीच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी. एका निरपराध युवतीवर बलात्कार होतो तिची हत्या होते. देशभर या घटनेचा तीव्र धिक्कार होत असताना आपले पंतप्रधान एकही शब्दही बोलत नाहीत. मी जेव्हा हाथरसला पीडित युवतीच्या घरी पोचलो तेव्हा मी त्यांना एकच सांगितले, की आपल्या पीडित मुलीसाठी आणि आपल्यासाठी मी आलो आहे. आपण ऐवटे नाहीत आम्ही तुमच्यासोबत हे सांगण्यासाठी मी तेथे गेलो होतो. 

उपर बैठे अपने पंतप्रधान भारत माता की बात करते है और झूठ बोलते है असे सांगत त्यांनी भारत-चीन प्रश्‍नालाही हात घातला. ते म्हणाले, की कोणी माना की न माना पण, चीनने भारताची बाराशे स्क्वेअर किलोमीटर जमीन लाटली आहे. हे सत्य असूनही आपली इमेज जपण्यासाठी देशाला ते खोटं बोलत आहेत. भारतात जे काही होत आहे त्यांच त्यांना काहीच पडलं नाही. लष्करातील कोणत्याही व्यक्तीला विचारा की चीनने जमीन लाटली की नाही म्हणून. चीनलाही माहीत आहे की वरती जी व्यक्ती बसली आहे ती आपली प्रतिमा जपत आहे. 

जर तसे काही नसेल तर मोदी पत्रकारांना सामोरे का जात नाहीत. ते पत्रकारांनाही का घाबरत आहे. त्यांना बोलवाना पत्रकार परिषदेत. मोदी हे चीन आणि पत्रकारांना घाबरतात त्याला केवळ एकच कारण आहे. ते म्हणचे प्रतिमा. प्रतिमा जपण्यासाठीच हे सुरू आहे. विरोधीपक्षनेत्याला सभागृहात आपल्या पंतप्रधानांनी सांगितले, की भारताची जमीन चीनने घेतलेली नाही म्हणून. किती खोट बोलायचं देशाशी असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख