वीज ग्राहक मेळावे होऊ देणार नाही..प्रविण दरेकरांचा इशारा - Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar warns not to allow power consumer rallies | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

वीज ग्राहक मेळावे होऊ देणार नाही..प्रविण दरेकरांचा इशारा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

वाढीव वीजबिलांबाबत निर्णय घेण्यासाठी सत्तारुढ तसेच विरोधकांच्या लोकप्रतिनिधींची संयुक्त समिती नेमावी, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

मुंबई : वाढीव वीजबिलांबाबत निर्णय घेण्यासाठी सत्तारुढ तसेच विरोधकांच्या लोकप्रतिनिधींची संयुक्त समिती नेमावी, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. अन्यथा वीजग्राहक मेळावे होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

या प्रश्नावर राज्य सरकार आणि उर्जामंत्री गेले चार महिने आश्वासने देऊन टोलवाटोलवी करत आहे. त्यामुळे आधीच कोरोनाने नाडलेल्या ग्राहकांना सर्वप्रथम दिलासा द्या, असेही दरेकर यांनी सांगितले आहे. 

महाविकास आघाडी सरकारने वीज बिल सवलतीबाबत यू-टर्न घेतला आहे. कोरोना काळात वीज बिल माफीची लोकप्रिय घोषणा केली. परंतु आता वाढीव वीज बिलातून ग्राहकांना दिलासा मिळणार नाही, मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे ऊर्जामंत्र्यांनी जाहीर केले आहे. ही वीजबिले चुकीची असून ती वाढीव जादा रकमेची दिली आहेत. त्यामुळे यासंदर्भात सत्यशोधनासाठी सत्तारूढ व विरोधी पक्षाच्या सदस्यांची समिती नेमावी. त्यातूनच सत्य बाहेर येईल, असेही दरेकर म्हणाले. 

जनताच झटका देईल : शेलार  
"वाचाळवीर उर्जामंत्री आधी वीजबिलात सवलत देतो" असे म्हणाले आणि आता शब्द फिरवला. अनैतिकतेतून जन्मलेल्या आणि राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या या सरकारला जनताच झटका देईल, अशी टीका भाजप आमदार आशीष शेलार यांनी ट्वीटद्वारे केली आहे.

हेही वाचा : बिहारच्या विकासासाठी भाजप नेत्यांची मदत घ्या.. 

मुंबई : वर्षभरापूर्वीचे ते दुःख विसरण्यासाठी भाजपचे नेते बिहारमध्ये गेले.  महाराष्ट्रात जो शब्द पळाला नाही तो बिहारात पाळला, असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपला हाणला आहे. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष नेत्याचं बिहारमध्ये कौतुक होत असल्याचा आनंद आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजप नेत्यांना चिमटा काढला आहे. नितीशकुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले हे ठीक; पण ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल काय, हा प्रश्नच आहे. बिहारमध्ये ज्यांची कामगिरी ठसठशीत व चमकदार झाली असे तेजस्वी यादव विरोधी पक्षात बसले. महाराष्ट्रातही सगळय़ात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे. बिहारच्या विजयाचा आनंद भाजपने पुढची चार वर्षे साजरा करीत राहावे. बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजप नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल, पण महाराष्ट्रातही शांतता नांदेल. नितीशकुमारांना आमच्या शुभेच्छा, अशा खोचक शब्दांत शिवसेनेनं भाजपला डिवचलं आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख