सहकाराच्या 'शुद्धीकरणामागे' भाजपची ही रणनिती 

पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या 30 कारखान्यांची यादी देत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
 BJP .jpg
BJP .jpg

मुंबई : केंद्रात नव्यानेच केलेल्या सहकार खात्याच्या मार्फत भारतीय जनता पक्ष सहकारात बस्तान बसवणार आहे. राज्यातील सहकाराच्या "शुद्धीकरणातून" भाजप आपली ताकद वाढवणार असल्याचे समजते. यासाठीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. (Leader of Opposition Devendra Fadnavis meet to Union Co-operation Minister Amit Shah) 

या भेटीत फडणवीस यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे नेते आणी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जयकुमार गोरे ,आमदार राहुल उपस्थित होते. यावेळी राज्यातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील सहकार कारखाने, सुतगिरण्या आदींच्या समस्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. 

असे असले तरी पश्चिम महाराष्ट्रात भाजपला विदर्भाप्रमाणे ताकद मिळवण्यासाठी सहकार क्षेत्रात शिरकाव करायचा आहे. याबाबत आगामी काळात केंद्राकडून कशाप्रकारे मदत मिळू शकेल. तसेच सहकार क्षेत्रातील गैरप्रकार कसे चव्हाट्यावर आणता येतील, याचा रोडमॕप लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येते. 

हा रोडमॕप तयार करण्यासाठीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील 30 सहकारी कारखान्याच्या कवडीमोलाने झालेल्या विक्रीची चौकशी करण्याचा डाव टाकला आहे. पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या 30 कारखान्यांची यादी देत चौकशी करण्याची मागणी केली आहे. हा सहकाराच्या "शुद्धीकरणातून" राज्यात भाजपची ताकद वाढवण्याची रणनिती आसल्याचे भाजपमधून सांगण्यात येते. 

Edited By - Amol Jaybhaye   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com