‘मास्क नाही, प्रवेश नाही’ मोहिमेची पालकमंत्र्यांनी केली स्वत:पासून सुरवात - Launch of No Mask, No Access campaign | Politics Marathi News - Sarkarnama

‘मास्क नाही, प्रवेश नाही’ मोहिमेची पालकमंत्र्यांनी केली स्वत:पासून सुरवात

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

"माझे कुटूंब माझी जबाबदारी" ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या जनजागृतीसाठी  "मास्क नाही, प्रवेश नाही " असा संदेश असणारा स्टीकर प्रकाशित करण्यात आले आहे.

बुलढाणा  : "माझे कुटूंब माझी जबाबदारी" ही मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या जनजागृतीसाठी  "मास्क नाही, प्रवेश नाही " असा संदेश असणारा स्टीकर प्रकाशित करण्यात आले आहे.

हे स्टीकर आपल्या वाहनाला लावून राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जनजागृती सुरूवात स्वत:पासून केली आहे. कोविडपासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व सोशल डिस्टसिंग या त्रिसुत्रींचा उपयोग करण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी केले आहे.

कोविडच्या काळात सतत विविध माध्यमातून सरकार जनजागृती करीत आहे. माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहिम त्यासाठी निर्णायक ठरणार आहे. या मोहिमेतंर्गत मोठ्या प्रमाणावर कोविडची जनजागृती करण्यात येत आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्वत: पासून सुरूवात करीत नागरिकांनी स्वत:चे व  कुटूंबाचे रक्षण करण्यासाठी मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री घरात बसून म्हणतात, ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ 

नागपूर : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. आधी मरणाऱ्यांची संख्या दर दिवसाला मोजली जात होती, आता दर तासाला मोजावी लागत आहे. राज्य सरकार याच गतीने चालत राहिले तर यापेक्षाही भयावह स्थिती निर्माण होणार आहे. आमचे मुख्यमंत्री आपल्या घरात बसून म्हणतात, ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’, ‘माझा गाव - माझी जबाबदारी’. ‘माझा महाराष्‍ट्र - माझी जबाबदारी’, असं ते का म्हणत नाहीत, असा रोखठोक सवाल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता सभागृहात विचारला आहे. मुख्यमंत्री म्हणून आपल्या जबाबदारीपासून ते दूर का पळताहेत. लोकांना हिंमत द्यायची ही वेळ आहे, पण ते स्वतःच कोरोनाला भ्यायलेले दिसत आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशा मागणीही खासदार राणा यांनी केली. आमच्या राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार हे ८० वर्षाचे आहेत. तरीही ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात फिरून कोरोनासंदर्भातील उपचाराच्या व्यवस्थेची पाहणी करत आहेत. लोकांना धीर देत आहेत आणि तरुण मुख्यमंत्री आपल्या घरात खुर्चीवर बसून महाराष्ट्रातील जनतेला ‘कुटुंबाची जबाबदारी’ शिकवत आहेत, हे कितपत योग्य आहे. कोरोनाची भयावहता आम्ही स्वतः अनुभवली आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख