लग्नसोहळ्यास १२५ जणांची उपस्थिती..५० हजारांचा ठोठावला दंड - Latur Attendance of 125 people at the wedding ceremony 50 thousand fine | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

लग्नसोहळ्यास १२५ जणांची उपस्थिती..५० हजारांचा ठोठावला दंड

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

तळेगाव येथे वाजत गाजत लग्न लावण्यात आले. तहसीलदार आल्याने मंडपातील अनेकांनी काढता पाय घेतला. 

लातूर : कोरोना संक्रमण काळात लग्न सोहळ्यावर अनेक निर्बंध  आहेत. दोन तासाच्या आत लग्न आणि 25 पेक्षा जास्त लोक नकोत असा नियम आहे, असे असतानाही लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथे वाजत गाजत लग्न लावण्यात आले. याची माहिती देवनी येथील तहसीलदार सुरेश घोळवे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ लग्न मंडपात जाऊन परिस्थितीची स्वत: पाहिली केली. त्यावेळी तेथे 125 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. 

प्रशासन हजर झाले असे लक्षात आल्याने मंडपातील अनेकांनी काढता पाय घेतला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव यांनी दंडात्मक कारवाई करण्यात आली. 50 हजारांचा आर्थिक दंड लावण्यात आला आहे. गट विकास अधिकारी मनोज राऊत, नायब तहसीलदार विलास तरंगे, मंडळ अधिकारी उद्धव जाधव आणि भरारी पथकातील कर्मचारी यावेळी हजर होते. 

या वर्षी लॉकडाऊननंतर राज्यात ब्रेक द चेन अंतर्गंत अनेक निर्बंध लादण्यात आले आहे.  ५० जणांच्या उपस्थितीत सुरक्षित अंतर पाळून मंगलकार्यालयात लग्न सोहळ्याचे आयोजन याआधी करता येत होते. मात्र आता २५  पेक्षा जास्त लोक नको, अशी अट घालण्यात आली आहे. मागील वर्षी ऐन मार्च महिन्यातच करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानं अनेकांनी लग्न सोहळे पुढे ढकलले होते. त्यामुळं दिवाळीनंतर लग्न सोहळ्याची लगबग सुरू झाली. यंदाही मार्चपासून लग्न सोहळ्यास सुरवात झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख