मोदींच्या तक्रारीनंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचे ट्विटर अकाउंट ब्लॉक... - lalu yadav daughter rohini acharya twitter account block sushil modi complained to twitter | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

मोदींच्या तक्रारीनंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचे ट्विटर अकाउंट ब्लॉक...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 मे 2021

टि्वटरने रोहिणी आचार्य यांचे अंकाउट बंद केले आहे.

नवी दिल्ली :  राष्ट्रीय जनता दलाचे RJDचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी दोन दिवसापूर्वी भाजपचे नेते सुशील मोदी (Sushil Modi यांच्यावर टि्वटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला होता. यावरुन टि्वटरने रोहिणी आचार्य rohini acharya यांचे अंकाउट बंद केले आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार  सुशील मोदींच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सुशील मोदींनी टि्वट करीत ही माहिती दिली आहे.  lalu yadav daughter rohini acharya twitter account block sushil modi complained to twitter

राष्ट्रीय जनता दलाचे RJDचे नेता तेजस्वी यादव Tejashwi Yadav यांच्या सरकारी निवासस्थानावर कोविडचे रुग्णालय सुरु आहे. यावर बिहारमध्ये विरोधकांनी टीका केली आहे. भाजपचे नेते, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी (Sushil Modi) यांनी या सर्व प्रकारला राजकीय नाट्य असल्याचे म्हटले होते. मोदींनी तेजस्वी यादव यांच्या एमबीबीएस  दोन्ही बहिनींवर टीका केली. 

लालू प्रसाद यादव यांचे चिंरजील तेजस्वी यादव यांनी पाटना येथे आपल्या सरकारी निवासस्थानी कोविड रुग्णालय सुरु केलं आहे. यावरून हा वाद निर्माण झाला आहे. "कोरोना काळात तेजस्वी यादव आपल्या डॅाक्टर बहीणींची मदत का घेत नाही," असा टोला मोदींनी तेजस्वी यादव यांना लगावला होता. याबाबत टि्वट सुशील मोदींनी केलं होत. भाजप नेते सुशील मोदी यांच्या टि्वटवर लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य या संतापल्या आहेत. 

त्यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं होत.  रोहिणी आचार्य यांनी टि्वट करीत मोदींवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. त्या आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, आमच्या नावावर राजकीय प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करु नका, आम्ही तेजस्वी यादव यांच्या बहिणी आहोत. यानंतर जर आम्हा बहिणींचे नाव घेतलं तर याद राखा, तुमच्या श्रीमुखात ठोसा मारणार. 

हेही वाचा :  मुख्यमंत्री साहेब, चक्री वादळाला लाजवेल असा तुमचा दौरा..मनसेची खोचक टिपण्णी.. 

मुंबई : तैाते  वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणचा दैारा केला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी नुकसान झालेल्या परिसराची पाहणी केली. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या दैाऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे Sandeep Deshpande यांनी टीका केली आहे.   "मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C M," असे टि्वट करुन देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या दैाऱ्याची खिल्ली उडवली आहे. 

  Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख