अदिती तटकरे, महेंद्र थोरवेंच्या कार्यक्षमतेवर प्रश्न...  - Kovid Center at Karjat and Khopoli closed | Politics Marathi News - Sarkarnama

अदिती तटकरे, महेंद्र थोरवेंच्या कार्यक्षमतेवर प्रश्न... 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

कर्जत आणि खोपोली येथे कोविड सेंटर बंद पडले आहे. तिकडे सुविधा नसल्याने त्यामुळे रायगड पालकमंत्री अदिती तटकरे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. 

मुंबई : कर्जत तालुक्यात कॉविडच्या उपचाराचासाठी एकही हॉस्पिटल नाही. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी पनवेल नवी मुंबई अशा ठिकाणी जावे लागते, त्यातही रुग्णाला वेळेवर अॅम्बुलन्स आणि बेड उपलब्घ होत नाही. त्यामुळे काही वेळा रुग्णांची तब्ब्येत ढासळते. परिणामी मृत्यूही ओढवतो. त्यामुळे नागरिकांकडून सरकारी व्यवस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. त्यामुळे तालुक्यातील वाढती संख्या लक्षात घेता तालुक्यात लवकरात लवकर कॉविड हॉस्पिटल सुरु करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

कर्जत आणि खोपोली येथे कोविड सेंटर बंद पडले आहे. तिकडे सुविधा नसल्याने त्यामुळे रायगड पालकमंत्री अदिती तटकरे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. कर्जत उपजिल्हारुग्णालयात 
हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा, अपुरा औषध पुरवठा, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी मशिनची असुविधा, शवगृहाची दुरवस्था, बंद अवस्थेतील उपकेंद्रे अशा एक अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

हेही वाचा : पुण्यापाठोपाठ कोरोना वाढतोय सांगलीत.. 

पुणे : पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात कोरोना बळींचा आकडा नऊ हजार २८२ झाला आहे. २.५९ इतका मृत्यू दर आहे. समाधानाची बाब म्हणजे पाचही जिल्ह्यात बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण ७५.४८ टक्के इतके आहे. पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 733 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 705 झाली आहे. अॅक्टीव रुग्ण संख्या 78 हजार 690 इतकी आहे. पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 40 हजार 423 रुग्णांपैकी 1 लाख 92 हजार 771 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 312 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 340 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.22 टक्के इतके आहे. तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 80.18 टक्के आहे.सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 27 हजार 363 रुग्णांपैकी 17 हजार 777 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 803 आहे. कोरोनाबाधित एकूण 783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख