ठाकरे सरकारला गुडघे टेकायला लावू ; राजू शेट्टींचा इशारा 

नरसिंहवाडी येथे रविवारी शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते जलसमाधी घेणार आहेत.
4Sarkarnama_20Banner_20_202021_04_04T162513.711.jpg
4Sarkarnama_20Banner_20_202021_04_04T162513.711.jpg

कोल्हापूर :  कोल्हापूर Kolhapur आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रयाग चिखली (ता. करवीर) येथून पंचगंगा परिक्रमेला कालपासून सुरूवात झाली. रविवारी (ता. ५) नरसिंहवाडी येथे शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते जलसमाधी घेणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी Raju Shetty यांनी दिला.


शेट्टी यांनी काल प्रयाग संगमावरील दत्त मंदिरात दत्ताला अभिषेक केला. सकाळी साडेसातपासूनच परिसरातील शेतकरी प्रयाग चिखली येथे येत होते. हातात झेंडे व तोंडात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो अशा घोषणा देत शेतकरी कार्यकर्त्यांनी प्रयाग चिखली सोडले. संघटनेचे कार्यकर्ते प्रयाग चिखली, आंबेवाडी येथे आल्यानंतर तेथील महिलांनी कार्यकर्त्यांच्या पायावर पाणी घालून औक्षण केले व परिक्रमेला बळ दिले.


संजय राऊतांची सुरक्षा का वाढवली; शेलारांनी सांगितले हे कारण! 
पूरग्रस्तांना अतितातडीची मदत सव्वा महिन्यानंतरही मिळालेली नाही, तरीही पूरग्रस्तांचे पैसे बॅंक खात्यावर पाठवल्याचे सांगून कोल्हापुरातील मंत्री खोटे बोलत आहेत. शासनाने आणि मंत्र्यांनी खोटे बोलणे बंद करावे. शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, लघु उद्योजकांच्या मागण्या तत्काळ मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल दिला.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रयाग चिखली (ता. करवीर) येथून पंचगंगा परिक्रमेला कालपासून सुरूवात झाली. रविवारी (ता. ५) नरसिंहवाडी येथे शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते जलसमाधी घेणार आहेत. शासनाला आणि कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या मंत्र्यांना अजून चार दिवसांची मुदत आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत आणि गेल्यावर्षी प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले पन्नास हजार रुपये तात्काळ मिळावे, नाहीतर आम्ही पाऊस, पुरातून वाचलो पण आता केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या धोरणात अडकलो, तरीही तुम्हाला गुडघे टेकायला लावू, अशा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरस्थितीनंतर कोल्हापूर जिल्हा दौरा केला. यावेळी तत्काळ मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र दौऱ्यानंतरअजूनही शेतकरी आणि व्यावसायिक शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. एकीकडे शेतकरी मरत असताना शासन मात्र वेळ काढूपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com