डॉ. श्रीमंत कोकाटे : आता माघार नाही...

दोन वर्षापासून पदवीधरांच्या संपर्कात आहे. त्यामुळे आता माघार नाही, तर पदवीधरांच्या हितासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी "सरकारनामा'शी बोलताना दिली.
0shrimant_kokate_satara_final.jpg
0shrimant_kokate_satara_final.jpg

कोल्हापूर : ही निवडणूक साखर कारखान्यांची नाही, तर सुज्ञ पदवीधरांची निवडणूक आहे. कोणाला निवडूण द्यायचे हे पदवीधरांनी आधीच ठरवले आहे. ज्या काळात काहीजण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना फितूर झाले होते. त्यावेळी, आम्ही भाजप आणि आरएसएस विरुध्द बंड पुकारले होते. दोन वर्षापासून पदवीधरांच्या संपर्कात आहे. त्यामुळे आता माघार नाही, तर पदवीधरांच्या हितासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी "सरकारनामा'शी बोलताना दिली. 


डॉ. कोकाटे यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी मागितली होती. अरुण लाड आणि डॉ. कोकाटे हे या उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण, राष्ट्रवादीकडून काल अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे कोकाटे यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

डॉ. कोकाटे म्हणाले, "गेल्या दोन वर्षापासून पदवीधरांची नाव नोंदणी, त्यांच्या समस्या जाणून घेणे, ज्यावेळी या मतदार संघाकडे पाहत नव्हते, त्यावेळेपासून आपण पदवीधरांच्या संर्पकात आहोत. त्यांच्या सर्व अडचणी माहिती आहेत. त्याचा स्वतंत्र अजेंडा घेवूनच ही निवडणूक लढवणार आहे. पदवीधर हे सुज्ञ आहे. त्यांना त्यांच्या मागण्या किंवा अडचणी दूर करणारा उमेदवार माहिती आहे."

पदवीधरची निवडणूक म्हणजे साखर कारखान्याची निवडणूक नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. पश्‍चिम महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्‍यात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र उभारले पाहिजे. गावगावात उच्च शिक्षित अधिकारी तयार झाला पाहिजे, हाच उद्देश ठेवून निवडणूक लढविली जाईल. तरुणांच्या हातात लेखनी आणि पुस्तक द्यायचे आहेत. त्यादृष्टीनेच वाटचाल केली जाईल. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून दिड लाख पदवीधरांची नोंदणी केली असल्याचेही डॉ. कोकाटे यांनी सांगितले.

विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून अरुण लाड यांच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार कधी जाहीर करणार याची उत्सुकता लागली असतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सतीश चव्हाण आणि अरुण लाड यांच्या नावाची घोषणा केली आहे.राष्ट्रवादीने जाहीर केलेले दोन्ही उमेदवार या निवडणूकीत विजयी होतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने आपली यादी जाहीर केली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघातू शिरीष बोरालकर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख, नागपूर विभागातून  संदिप जोशी आणि अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून नितीन धांडे यांची नांवे जाहीर झाली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील पदवीधर मतदार आपला प्रतिनिधी विधान परिषदेवर पाठविणार आहेत.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून बोराळकर यांच्यासह घुगे, शितोळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी देखील उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. परंतु बोराळकर यांनी या सर्वांवर मात करत उमेदवारी मिळवली. फडणवीस यांचे समर्थक म्हणून बोराळकर ओळखले जातात. २०१४ मध्ये बोराळकर यांनी पदवीधरची निवडणूक लढवली होती. पण तेव्हा राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला होता. आता पु्न्हा या दोघांमध्ये लढत होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com