सोमय्या यांनी सांगितली या मंत्र्याला बॅग भरायला    

बजरंग खरमाटे हे परिवहन मंत्री अनिल परब यांचे विशेष सचिव होते.
 Kirit Somaiya, Jitendra Awhad .jpg
Kirit Somaiya, Jitendra Awhad .jpg

सांगली : दिवाळीपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची इलेव्हन सेना तुरुंगात जाईल, तसेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) तुम्ही आता बॅग भरा...असा थेट इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. ठाकरेंच्या इलेव्हन सेनेच्या भ्रष्टाचाराचे घोटाळे पुराव्यासह उघडकीस आणणार, असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. (Kirit Somaiya criticizes Uddhav Thackeray) 

किरीट सोमय्या सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना ईडीकडून नोटीस देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी सोमवारी बजरंग खरमाटे यांच्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव येथील वंजारवाडी गावासह खरमाटे यांच्या मालमत्ता असणाऱ्या ठिकाणांना भेट दिली आहे. त्यानंतर त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

बजरंग खरमाटे हे परिवहन मंत्री अनिल परब यांचे विशेष सचिव होते. त्यामुळे 40 प्रॉपर्टीची बेहिशोबी साडेसातशे कोटींची मालमत्ता आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला. ती कुठून आली? याची मागणी आपण केली आहे. तर खरमाटे यांची ही संपत्ती आहे की, अनिल परब यांचा बेनामी पैसा आहे. लवकरच समोर येईस, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. पण ठाकरे सरकारांचा एक अनिल तुरुंगाचा दरवाजावर आहे. तर दुसरा अनिल म्हणजे अनिल परब मुहूर्त काढत आहे, असेही सोमय्या म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांनी देखील 900 कोटी रुपयांचा घोटाळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीच केला आहे. असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. आता अनिल परब यांच्यावर कारवाई झालेली आहे. पुढच्या आठवड्यात भावना गवळीच्यावर होणार आणि त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांचाही नंबर असून आव्हाड यांना आपली जाहीर नोटीस असणार आहे. त्यामुळे आव्हाड तुम्ही देखील आता बॅग भरायला लागा, असा इशारा सोमय्या यांनी आव्हाड यांना दिला आहे. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com