मुंडे संतती..तर ठाकरे संपत्ती लपवितात.. - Kirit Somaiya agitation to file a case against Pratap Saranaik | Politics Marathi News - Sarkarnama

मुंडे संतती..तर ठाकरे संपत्ती लपवितात..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

प्रताप सरनाईक अनधिकृत बांधकामात व्यस्त आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी  केला आहे.

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपत्ती लपवत आहे, धनंजय मुंडे संतती लपवतात तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक अनधिकृत बांधकामात व्यस्त आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी  केला आहे.

ठाणे महापालिकेसमोर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत विहंग गार्डन इमारतीबाबत किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्या समवेत स्थानिक भाजप नगरसेवक यांनी केले ठिय्या आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकार व सरनाईक यांच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या. 

नौपाडा पोलिसांनी सोमय्यायांच्यासह भाजप नगरसेवकांना ताब्यात घेतले आहे. किरीट सोमय्या म्हणाले की सरनाईक यांनी 2008मध्ये विहंग गार्डन ही अनाधिकृत इमारत बांधली आहे. ती 14 वर्षांनंतरही अनाधिकृत आहे. हे तोडण्याचे आदेश देण्यात आला. त्यांना दंड आकाऱण्यात आला. अकरा कोटी रूपये सरनाईक यांनी भरायचे आहे. सरदेसाई यांनी ठाकरेंकडे विनंती केली की फक्त  25 लाख भरेल. त्याला ठाणे महापालिकेने मान्यता दिली. अकरा कोटीचा दंड सरनाईक यांनी फक्त 25 लाख रूपये भरला. त्यांच्यावर फैाजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी सोमय्या यांनी केली. किरीट सोमय्या यांच्या सोबत आमदार निरंजन डावखरे, स्थानिक भाजप नगरसेवक यांनी केले ठिय्या आंदोलन केले. 

नौपाडा पोलिसांनी घेतले सोमय्या सह भाजप नगरसेवकांना ताब्यात घेतले आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेच्या प्रश्नावरुन सतत सवाल उठवणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मुलाची नील सोमय्या यांची काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांनी एका ठेकेदाराला धमकी दिल्या प्रकरणी तीन तास कसून चौकशी केली. मुंलुंड पोलिस ठाण्यात ही चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
किरीट सोमय्या जनतेसमोर मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढत आहेत, म्हणून अश्या खोट्या केसेस टाकल्या जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. विरोधकांवर केसेस करण्याचा हा कट आहे. किरीट सोमय्या प्रकरणे बाहेर काढत आहेत, म्हणून त्यांची मुस्कटदाबी सुरु आहे. गिरीश महाजन, प्रसाद लाड, चित्रा वाघ, नील सोमय्या अश्या लोकांवर केसेस दाखल करून सरकार विरोधातील लोकांना टार्गेट करणे सुरू आहे, असेही दरेकर यांनी म्हटले आहे. एका ठेकेदाराला धमकावून दोन टाॅवरचे काम स्वतःच्या मर्जीतल्या ठेकेदाराकडे दिल्याचा आरोप नील सोमय्या यांच्यावर आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख