खडसे यांच्या पक्षातून जाण्याने धक्का बसला : पंकजा मुंडे 

खडसेसाहेब पक्षातच राहावेत, अशी पोस्ट मी काल केली होती.
Khadse's departure came as a shock : Pankaja Munde
Khadse's departure came as a shock : Pankaja Munde

जालना : "ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साहेब पक्षातच राहावेत, अशी पोस्ट मी काल केली होती. मी आज दिवसभर प्रवासात आहे, त्यामुळे खडसे यांच्या निर्णयाबद्दल मला काही माहीत नाही. मात्र, त्यांच्या पक्ष सोडून जाण्याने मला धक्का बसला आहे,' अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. 

भाजपचे माजी मंत्री नाथाभाऊ खडसे यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत खडसे हे येत्या शुक्रवारी पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. 

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या पंकजा मुंडे यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, मी प्रवासात आहे. त्यामुळे मलाही तुमच्याकडूनच ही माहिती मिळाली आहे. पण खडसेसाहेब पक्षातच राहावेत, अशी पोस्ट मी काल केली होती. खडसे यांच्या निर्णयाबद्दल मला काही माहीत नाही. मात्र, त्यांच्या पक्ष सोडून जाण्याने मला धक्का बसला आहे. 

कोण काय म्हणाले? 


आमच्यासाठी धक्कादायक, दुःखदायक, चिंतन करायला लावणारी घटना : मुनगंटीवार 

"नाथाभाऊ यांच्या राजीनाम्याची बातमी आमच्यासाठी नक्कीच धक्कादायक आहे. ज्यांनी 40 वर्षे भारतीय जनता पक्षाची सेवा केली, पक्ष वाढवला, ते खडसे आज कोणत्यातरी नाराजीतून पक्ष सोडून जात आहेत. ते आमच्यासाठी धक्कादायक, दुःखदायक आणि निश्‍चित चिंतन करण्यासारखे आहे,' अशी स्पष्ट कबुली माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

मुनगंटीवार म्हणाले की, नाथाभाऊंचे पक्ष सोडणे जाणे आमच्यासाठी धक्कादायक आहे. पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे. कारण, खडसेंसारख्या नेत्याने सुमारे 40 वर्षे पक्षाची सेवा केली आहे. राज्यात पक्ष वाढविला आहे. एक चांगला नेता आम्हाला सोडून जात आहे, त्याचे दुःख आहे. 


मी भाजप सोडणार नाही : खासदार रक्षा खडसे 

"आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे. नाथाभाऊंच्या निर्णयाचे आम्हाला दुःख आहे. पण, मी भारतीय जनता पक्ष सोडणार नाही. मी भाजपची खासदार म्हणून निवडून आले आहे, त्यामुळे मी भाजपतच काम करत राहणार आहे,' अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नूषा खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंच्या राजीनाम्यावर दिली. 

नाथाभाऊंच्या या बहुचर्चित राजीनाम्यानंतर रक्षा खडसे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्तीगत कारणामुळे भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुखदायक आहे. नाथाभाउंच्या निर्णयाचे आम्हाला पक्ष म्हणून दुःख आहे. 

पक्ष सोडण्याबाबत रक्षा खडसे म्हणाल्या की मी भाजपकडून निवडून आले आहे. भाजपचा उमेदवार म्हणून लोकांनी मला निवडून दिले आहे. मी भाजपतच राहणार असून पक्षाचे काम करत राहणार आहे. पक्ष जो काही जबाबदारी देईल, ती मी पूर्ण करणार आहे, असे सांगत आपण पक्ष सोडणार नसल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com