पंतप्रधान मोदींचा असाही विक्रम : सात वर्षांत लाल किल्ल्यावरून केलेल्या या आहेत घोषणा - Key moments from PM’s seven Independence Day speeches | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान मोदींचा असाही विक्रम : सात वर्षांत लाल किल्ल्यावरून केलेल्या या आहेत घोषणा

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन' या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. गेल्या सहा वर्षांत मोदींनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या घोषणांचा हा आढावा

नवी दिल्ली : लाल किल्ल्यावरून सलग सातव्या वेळेस संबोधित करणारे पहिले बिगर कांग्रेसी पंतप्रधान व लोकशाही पद्धतीने निवडून येऊन देशात (केंद्र व राज्य) सर्वाधिक काळ सरकार चालविणारे लोकप्रतिनिधी असा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आज केला. कोरोना महामारीमुळे यंदा नेहमीपेक्षा कमी म्हणजे सुमारे 4000 जणांच्या उपस्थितीत लाल किल्ल्यावर झालेल्या सोहळ्याच्या पूर्वी त्यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

या आधीच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणा

२०१४: पीएन जनधन योजना, कौशल्य विकास योजना (स्किल इंडिया), मेक इन इंडिया, स्वच्छ भारत योजना, नियोजन आयोगाऐवजी नीती आयोगाची घोषणा

२०१५ : सेवानिवृत्त लष्करी अधिकारी व जवान यांच्यासाठी वन रँक वन पेन्शन योजना, उद्योगशीलतेला वाव देण्यासाठी 
स्टार्टअप इंडिया,  काळा पैसा बाहेर काढण्याचे उद्दीष्ट, २०२२ पर्यँत देशाला विकसित देश म्हणून ओळख करून देणे, १८५०० खेड्यात वीजपुरवठा करणे

२०१६ : दोन कोटी पेक्षा जास्त टॉयलेट बांधण्याची योजनात. गरिबीविरुद्ध युद्ध पुकारण्याची घोषणा. Reform, perform, transform, हा मंत्र दिला. पाच कोटी कुटुंबांनी तीन वर्षांत गॅस स्टोव्ह देण्याची घोषणा

२०१७ : चलता है, ही मनोवृत्ती सोडून देण्याचे देशवासीयांना आवाहान. 1942 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधाच `छोडो भारत` या आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आता `जोडो भारत`ची घोषणा. कॅशलेस अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट

२०१८ : 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा. ईशान्य भारतासाठी दिल्ली आता दूर नसेल तर दिल्लीच आता ईशान्य भारतात जाईल, अशी भावनिक साद.

२०१९ : `वन नेशन ,वन कॉन्स्टिट्यूशन`च्या दिशेने पावले टाकल्याचे सांगितले. राज्य घटनेतील कलम 370 बदले.  35 ए आर्टिकल रद्द झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पायाभूत सुविधांसाठी पुढील पाच वर्षांत 100 लाख कोटी खर्च करण्याची घोषणा. पुढच्या पाच वर्षात पाच ट्रिलियन डॉलरएवढी देशाची अर्थव्यवस्था करणार, असा विश्वास व्यक्त केला.

2020 : नेशनल डिजिटल हेल्थ मिशन ही योजना देशाच्या आरोग्य क्षेत्रात क्रांती आणणारी ठरेल. यात प्रत्येक नागरिकाला त्याच्या प्रकृती आणि आरोग्याबद्दलचे डिजिटल कार्ड दिले जाईल आणि त्यात त्याच्यावर पूर्वी झालेल्या वैद्यकीय उपचारांची समग्र माहिती असेल.  भारताच्या थेट विदेशी गुंतवणुकीलामध्ये विक्रमी 18 टक्के वाढ झाली असून एफडीआय आणि परकीय चलन गंगाजळीने सारे विक्रम तोडले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख