मंत्र्याला लोकायुक्तांचा झटका; महामंडळावरील नातेवाईकाच्या नियुक्तीनं मंत्रीपद जाणार

मंत्र्यांनी पदाचागैरवापर करून राज्य अल्पसंख्यांक विकास वित्त महामंडळाच्या सरव्यवस्थापक पदाच्या पात्रतेत बदल केला.
Kerala Lokayukta has found Minister KT Jaleel guilty
Kerala Lokayukta has found Minister KT Jaleel guilty

तिरूवनंतपुरम : नियम डावलून नातेवाईकाला नोकरी लावणं कॅबिनेट मंत्र्याला चांगलेच महागात पडणार आहे. याप्रकरणाची लोकायुक्तांनी चौकशी केल्यानंतर संबंधित मंत्र्याने पक्षपातीपणा आणि आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. 

केरळ उच्च शिक्षण मंत्री के. टी. जलील यांना मंत्रीपद गमवावे लागण्याची शक्यता आहे. व्ही. के. मोहम्मद शफी यांनी लोकायुक्त कार्यालयाकडे याबाबतची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर लोकायुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली.

जलील यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून केरळ राज्य अल्पसंख्यांक विकास वित्त महामंडळाच्या सरव्यवस्थापक पदाच्या पात्रतेत बदल केला. त्यानंतर त्यांनी या पदावर जवळचे नातेवाईक असलेल्या के. टी. अदीब यांची नियुक्ती केली, अशी तक्रार होती. त्यामध्ये लोकायुक्तांनी केलेल्या चौकशीत तथ्य आढळून आले आहे.

याबाबतचा अहवाल लोकायुक्तांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. तसेच जलील यांना मंत्रीपदावरून हटविण्याचे शिफारसही केली आहे. आपल्या नातेवाईकाच्या नियुक्तीसाठी जलील यांनी या पदाच्या पात्रतेमध्ये 'बीटेक विथ बीजीडीबीए' या शैक्षणिक पात्रतेचा समावेश केल्याचे समोर आले आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केला आहे. त्यांनी घेतलेल्या शपथेचेही उल्लंघन केले आहे, असे लोकायुक्तांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

लोकायुक्तांनी आपला अहवाल मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे लोकायुक्त कायद्यानुसार मुख्यमंत्र्यांना या अहवालानुसार कारवाई करण्याचे अधिकार आहेत. आता मुख्यमंत्र्यांना जलील यांच्या मंत्रीपदाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. दरम्यान, केरळच्या विधानसभा निवडणूकीचा निकाल 2 मे रोजी आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com