केरळमध्ये कॅाग्रेस पिछाडीवर..एलडीएफ 21, तर यूडीएफ 7 जागांवर आघाडीवर, - In Kerala LDF leads with 21 seats UDF leads with 7 seats | Politics Marathi News - Sarkarnama

केरळमध्ये कॅाग्रेस पिछाडीवर..एलडीएफ 21, तर यूडीएफ 7 जागांवर आघाडीवर,

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 मे 2021

केरळमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा ट्रेंड आहे.

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये यूडीएफ, एलडीएफ या दोन्ही आघाड्यांना राज्याच्या सत्तेत यायचे आहे. या दोंघामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत केरळमध्ये एलडीएफ 21 जागांवर आघाडीवर आहे. तर यूडीएफ 7 जागांवर आघाडीवर आहे.  

केरळ विधानसभेच्या 140 जागांची मतमोजणी सुरू झाली आहे. केरळमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा ट्रेंड आहे. या वेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयन सत्तेत टिकून राहिल्यास या परंपरेला हा छेद असेल. राज्यात भाजपने आक्रमक प्रचार मोहीम केलेली असली तरी कोणत्याही एक्झिट पोलने भाजपसाठी राज्यात तीन ते पाचपेक्षा जास्त जागांचा अंदाज वर्तविला नाही.  मुख्यमंत्री विजयन यांच्या नेतृत्वात डाव्या आघाडीला पुन्हा संधी मिळेल असा जनमत चाचण्यांचा कौल आहे.

केरळ हे देशातील एकमेव डावे राज्य असल्याने आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या केरळ मोहिमेचे नेतृत्व केले असल्याने ही निवडणूक दोन्ही पक्षांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. केरळमधील 2021 च्या विधानसभा निवडणुकीत 70.52 टक्के लोकांनी मतदान केले आहे.
 
2016 च्या केरळ विधानसभा निवडणुकांकडे पाहिल्यास एका टप्प्यात झालेल्या मतदानात एलडीएफने 140 पैकी 91 जागा जिंकून सरकार स्थापन केले. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) 47 जागा मिळाल्या. राज्यात बहुमतासाठी 71 जागांची आवश्यकता आहे. याच निवडणुकीत भाजपला 1, माकपला 19, माकपला 58, कॉंग्रेसला 22, राष्ट्रवादीला 2, आययूएमएल 18, जेडीएसला 03, केरळ कॉंग्रेसला (एम) 1 आणि इतरांना 11 जागा मिळाल्या.
 
राज्यात १४० जागा असून, ११४ मतदान केंद्रे आहेत. येथे डाव्या आघाडीपुढे काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीचे आव्हान आहे. विजयन यांच्या प्रतिमेमुळे राज्यात सत्ताबदलाची शक्यता कमी असल्याचा जनमत चाचण्यांचा अंदाज आहे. 

मुख्यमंत्री पिनरई विजयन यांची लोकप्रियता हा महत्वाचा मुद्दा आहे. विजयन यांची प्रतिमा डाव्या पक्षांसाठी उभारी देणारी आहे. या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वांचे जाहीरनामे हे विकासावर भर देणारे होते
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख