Kerala Higher Education Minister KT Jaleel resigns
Kerala Higher Education Minister KT Jaleel resigns

उच्च शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा; नातेवाईकाला नोकरी देणं पडलं महागात

राज्य अल्पसंख्यांक विकास वित्त महामंडळाच्या सरव्यवस्थापकपदी नातेवाईकाची नियुक्ती केली होती.

तिरूवनंतपुरम : नियम डावलून नातेवाईकाला नोकरी लावणं उच्च शिक्षण मंत्र्याला चांगलेच महागात पडले आहे. त्यांनी पदाचा दुरूपयोग करत पक्षपातीपणा आणि आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्याचे आदेश लोकायुक्तांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते.

केरळचे उच्च शिक्षण मंत्री के. टी. जलील यांना मंत्रीपद गमवावे लागले आहे. त्यांनी आज आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर केला आहे. व्ही. के. मोहम्मद शफी यांनी लोकायुक्त कार्यालयाकडे याबाबतची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर लोकायुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली.

जलील यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून केरळ राज्य अल्पसंख्यांक विकास वित्त महामंडळाच्या सरव्यवस्थापक पदाच्या पात्रतेत बदल केला. त्यानंतर त्यांनी या पदावर जवळचे नातेवाईक असलेल्या के. टी. अदीब यांची नियुक्ती केली, अशी तक्रार होती. त्यामध्ये लोकायुक्तांनी केलेल्या चौकशीत तथ्य आढळून आले आहे. 

जलील यांनी आपल्या नातेवाईकाच्या नियुक्तीसाठी जलील यांनी या पदाच्या पात्रतेमध्ये 'बीटेक विथ बीजीडीबीए' या शैक्षणिक पात्रतेचा समावेश केल्याचे समोर आले आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केला आहे. त्यांनी घेतलेल्या शपथेचेही उल्लंघन केले आहे. त्यामुळे जलील यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे लोकायुक्तांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या अहवालात म्हटले होते. 

दरम्यान, जलील यांनी लोकायुक्तांच्या आदेशाविरोधात सोमवारीच केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कोणत्याही चौकशीही अहवाल तयार करण्यात आला आहे. केरळ लोकायुक्त अधिनियमांतर्गत या प्रकरणाची चौकशी लोकायुक्त करू शकत नाहीत. केरळ उच्च न्यायालय व राज्यपालांनीही या प्रकरणावर सुनावणी घेण्यास नकार दिला होता, असे जलील यांनी याचिकेत म्हटले आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com