केरळच्या राज्यपालांना कोरोनाची लागण... - Kerala Governor Arif Mohammad Khan infected with corona   | Politics Marathi News - Sarkarnama

केरळच्या राज्यपालांना कोरोनाची लागण...

वृत्तसंस्था
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी कोरोनाची तपासणी केली होती.  

मुंबई : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी कोरोनाची तपासणी केली होती. त्यांची कोरोना टेस्ट पॅाझिटिव्ह आली आहे.

याबाबत राज्यपाल आरिफ मोहम्मद खान  यांनी टि्वट करून माहिती दिली आहे. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की माझी कोरोना टेस्ट पॅाझिटिव्ह आली आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली येथील भेटीत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन राज्यपालांनी केले आहे.  

देशात गेल्या 24 तासात 50 हजार 356 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. देशभरात एकूण 84 लाख 62 हजार 080 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 78 लाख जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात 92.41 टक्के रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.   

हेही वाचा: शेवटचा माणूस कोरोनामुक्त होईपर्यंत काळजी घ्या !

नाशिक : सबंध जगात काही महिन्यांपासून कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. सध्या रुग्णसंख्येचा दर घटत असल्याने एक सकारात्मकता आली आहे. तरीही शेवटचा माणूस कोरोनामुक्त होईपर्यंत आपण काळजी घेणे आवश्यक आहे, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. भुजबळ यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गवंडगाव ते भागवत वस्ती रस्त्याचे भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोरोनामुळे राज्याचा अधिकाधिक खर्च हा आरोग्य विभागासाठी खर्च होत आहे; कारण 'जान है तो जहाँ है'. जर माणूस असेल तरच सर्व काही आहे. विकासकामे होत जातील आणि शासनस्तरावर आपण प्रयत्न करून मतदारसंघात अधिकाधिक विकास कामे होण्यासाठी निधी आणू आणि ते विकासकामे मार्गी लागण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजात काही ठिकाणी अटकाव करण्यात आला होता; मात्र, अर्थव्यवस्था सुरू रहावी यासाठी शासन हळूहळू सर्व पूर्वपदावर आणत असून लवकरच सर्व व्यवहार पूर्व पदावर येतील. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख