राहुल गांधींचे राजकीय भवितव्य ठरविणार केरळची निवडणूक...  - kerala assembly election results decide rahul gandhi political future | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधींचे राजकीय भवितव्य ठरविणार केरळची निवडणूक... 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 मे 2021

राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे

नवी दिल्ली : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. केरळमधील निवडणूक ही कॅाग्रेससाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.. काँग्रेसच्या ५४ खासदारांपैकी १९ खासदार केरळमधून निवडून आले आहेत. 

विशेष म्हणजे कॅाग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे. केरळच्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी प्रचाराची धुराळा उडवून दिला होता. त्यामळे ही निवडणूक राहुल गांधींचे राजकीय भवितव्य ठरविणार आहे. केरळच्या निवडणुकीचा परिणाम राहुल गांधींच्या राजकीय जीवनावर नक्कीच होणार आहे.

केरळमध्ये १४० जागांसाठी होत असलेली विधानसभेची ही निवडणूक कॅाग्रेसला सत्तेपासून दूर ठेवते का विजयाची माळ गळ्यात घालते, हे लवकरच समजेल. यंदाची निवडणुक ही कॅाग्रेससाठी अवघड आहे. कारण एक्झिट पोलनुसार एलडीएफची सत्ता पुन्हा केरळमध्ये येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची लोकप्रियता वाढलेली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी त्यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कैातुक होत आहे. त्यामुळे कॅाग्रेसला त्या तुलनेत सामान्यापर्यंत पोहचता आले नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. उत्तर आणि दक्षिण वादाचा फटका कॅाग्रेसला बसण्याची शक्यता आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॅाग्रेसचा १५ जागांवर विजय झाला होता.  पण विधानसभा निवडणुकीत प्रचारात पिछाडीवर असल्याची टीका राजकीय विश्लेषकांनी केली होती. 

कॅाग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तिय असले तरी केरळ कॅाग्रेसने त्यांना स्वीकारलेले नाही. त्यातच माजी मुख्यमंत्री ओमान चंडी आणि रमेश चेन्नीथला यांच्यातील वाद जगजाहीर आहे. तिकीट न मिळालेले नाराज नेत्यांनी प्रचारात किती सहभाग घेतला हे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर स्पष्ट होईल. लेटरबॅाम्बनंतर कॅाग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती, लेटरबॅाम्बचा हा गट केरळच्या निकालाकडे लक्ष ठेवून आहे. केरळमध्ये कॅाग्रेस विजयी ठरली तर राहुल गांधी हे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा सक्रिय होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख