काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी केलं मुंडन...कारण वाचून बसेल धक्का - Kerala assembly election Mahila Congress chief gets her head tonsured | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी केलं मुंडन...कारण वाचून बसेल धक्का

वृत्तसंस्था
रविवार, 14 मार्च 2021

उमेदवारी यादीत नाव नसलेल्या इच्छुकांकडून पक्षाकडे उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. उमेदवारी यादीत नाव नसलेल्या इच्छुकांकडून पक्षाकडे उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे. केरळमधील काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षांचे तिकीटही कापण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या या नेत्याने चक्क पक्ष कार्यालयासमोरच मुंडन केले. 

काँग्रेसने आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. केरळच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा लतिका सुभाष यांना तिकीट नाकरण्यात आले आहे. त्या एट्टूमनूर मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित होत्या. त्यांना पक्षाने २०१८ मध्ये महिला प्रदेशाध्यक्ष केले होते. त्यावेळी राहुल गांधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. 

तिकीट नाकारल्याचे समजताच लथिका यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयासमोरच त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच कार्यालयासमोरच मुंडन करत आपली नाराजी व्यक्त केली. लथिका यांच्या या पवित्र्याने पक्षाचे नेते व कार्यकर्तेही हैराण झाले. तसेच केरळमध्ये यावरून बरीच उलटसुलट चर्चा झाली. लथिका यांच्या या कृतीमुळे काँग्रेसला निवडणुकीत फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : बंगालमध्ये भाजपची खेळी; केंद्रीय मंत्री, खासदारांना उतरवले मैदानात

लथिका यांनी पदाचा राजीनामा दिला असला तरी पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अपक्ष म्हणूनही उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, काँग्रेसकडून आज ८६ उमेदवारांची यादी प्रसिध्द कऱण्यात आली आहे. पक्षाकडून केरळमध्ये ९२ जागांवरून निवडणूक लढविण्यात येणार आहे.

माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्यासह विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला, खासदार के. मुरलीधरन यांनाही तिकीट देण्यात आले आहे. भाजला २०१९ च्या निवडणुकीत केरळमध्ये एकही जागा मिळाली नाही. यावेळी भाजपने निवडणुकीसाठी जोर लावला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख