भाजपच्या नेत्याची अश्लील सीडी सार्वजनिक..नोकरीच्या आमिषाने अत्याचार...

रमेश जारकीहोळी यांच्या अनैतिक संबंधाची सीडी सार्वजनिक झालीआहे.
Ramesh3.jpg
Ramesh3.jpg

बेळगाव : कर्नाटकमधील भाजपचे नेते, बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची अश्लील सीडी सार्वजनिक झाली आहे. नोकरीचे आमिष दाखवून त्यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

बेंगलुरू येथील नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कल्लाहल्ली यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. कल्लाहल्ली यांनी सांगितले की मी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत चैाकशी करावी.

दिनेश कलहळ्ळी यांनी पोलिसात धाव घेऊन सखोल चौकशीची आणि तरुणीला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. दिनेश कलहळ्ळी यांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अनैतिक संबंधाची सीडी सार्वजनिक केली आहे. या सीडीमुळे रमेश जारकीहोळी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

रमेश जरकीहोळी म्हणाले, "हा बनावट व्हिडिओ आहे. त्या महिलेला, आणि तक्रार करणाऱ्यांला मी ओळखत नाही. मी सध्या मैसूर येथे आहे. याबाबत मी पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहे. त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. जर आरोप सिद्ध झाले तर मी मंत्रीपद आणि राजकारण सोडून देईल."  

दरम्यान, रमेश जारकीहोळी यांच्यावर झालेल्या आरोपानंतर बेंगलुरू येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. याबाबत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की मी प्रसारमाध्यमांमध्ये राज्यमंत्री रमेश जारकीहोळी यांचा व्हिडिओ पाहिला आहे. याबाबत मी मुख्यमंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करणार आहे. या सीडीची सत्यता पडताळून पाहिली जाईल. त्यानंतर आरोप सिद्ध झाल्यास योग्य की कारवाई करण्यात येईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com