भाजपचे नेते म्हणतात, "कंगनाची पण चैाकशी व्हायला पाहिजे.." - Kangana has confessed to taking drugs. The same should be done with the check by NCB | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे नेते म्हणतात, "कंगनाची पण चैाकशी व्हायला पाहिजे.."

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

ड्रग्ज घेतल्याची कबुली कंगनाने दिली आहे. त्यामुळे तिचीही चैाकशी व्हायला पाहिजे," असं मत विरोधीपक्षनेते, भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.  

पुणे : "कायदा सर्वासाठी समान आहे. सगळ्याना बाबत जो न्याय आहे. तशाच न्याय अभिनेत्री कंगना राणावत विषयी पाहिजे. ड्रग्ज घेतल्याची कबुली कंगनाने दिली आहे. त्यामुळे तिचीही चैाकशी व्हायला पाहिजे," असं मत विरोधीपक्षनेते, भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॅालीवुडमधील अनेक कलाकारांशी चैाकशी होत आहे. कंगना राणावतने जर ती ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली असेल आणि याबाबत पुरावे असेल तर तिची चैाकशी एनसीबीने केली पाहिजे, असे दरेकर यांनी सांगितलं. बॅालीवुडमधील अनेक कलाकारांचा ड्रग्जशी संबध असल्याचा आरोप सध्या होत आहे.

अनेक कलाकारांचे नाव समोर येत आहे. तर काहींना एनसीबीनं त्यांना चैाकशीसाठी नोटिस पाठविली आहे. राज्यातील महत्वाच्या मुद्यावरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी राज्य सरकार या ड्रग्ज प्रकरणाकडं सगळ्याचं लक्ष वळवित असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. 

सुशांतची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीत तिने बॉलीवूडमधील कलाकारांची नावे उघड केली आहेत. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, राकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. एनसीबीचे पथक सारा आणि श्रद्धाच्या घरी पोचले आहे. पथकाने या दोघींना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. एनसीबीचे पथक आता इतर अभिनेत्रींच्या घरी जाऊन त्यांना समन्स बजावणार आहे. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. 

याचबरोबर दीपिकाची मॅनेजर करिष्मा प्रकाश आणि केडब्लूएएन टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपकर यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, करिष्मा प्रकाश हिने तब्येत बरी नसल्याचे कारण देऊन चौकशीला हजर होण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited  by : Mangesh Mahale 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख