जर एखाद्याने त्यांच्या आई-बहीणीला आयटम म्हटले तर चालेल का ? चौहानांचा सवाल

एका सभेत बोलताना ते म्हणाले, की कमलनाथ तुम्हाला काय झाले आहे. आपण 74 वर्षाचे झाले आहात.
जर एखाद्याने त्यांच्या आई-बहीणीला आयटम म्हटले तर चालेल का ? चौहानांचा सवाल

भोपाळ : "" जर एखाद्याने तुमच्या आई आणि बहीणीला आयटम म्हटले तर ते आपण सहन करणार का कमलनाथजी ? असा सवाल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. राज्यात प्रचार शिगेला पोचला असतानाच कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भाजपच्या महिला उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली.

त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजीमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. कमलनाथ यांनी त्यांना आयटम म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

कमलनाथ यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ शिवराजसिंह चौहान यांनी काल मौनवृत्त पाळून आंदोलनही केले होते. आज चौहान यांनी कमलनाथ यांचा पुन्हा समाचार घेतला.

एका सभेत बोलताना ते म्हणाले, की कमलनाथ तुम्हाला काय झाले आहे. आपण 74 वर्षाचे झाले आहात. तुम्ही अमरिती देवी विषयी जे काही बोलला ते मी पुन्हा रिपिट करीत नाही.आम्ही जेव्हा तुमच्या त्या विधानाला आक्षेप घेतला तेव्हा त्यांनी दिलगिरी व्यक्त करताना म्हटले की प्रत्येक जण आयटम असतो. जर तुमच्या आई किंवा बहीणीला कोणी आयटम म्हटले तर चालेला का ? असा सवालही त्यांनी केला आहे. कमलनाथ यांच्यावर चौहान हे चांगलेच संतप्त झाले आहे. 

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबरला होत आहेत. कॉंग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

जोतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते.

आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

कइमरती देवी उभ्या असलेल्या डाबरा मतदारसंघातील सभेत बोलताना कमनाथ यांनी हे वक्तव्य केले होते. आमचा येथील उमेदवार तिच्यासारखा नाही...काय बरे तिचे नाव? असा सवाल कमलनाथ यांनी सभेला उपस्थित नागरिकांना केला. त्यावेळी नागरिकांना इमरती देवी यांचे नाव घेण्यास सुरूवात केली. यावर कमलनाथ म्हणाले की, माझ्यापेक्षा तुम्ही तिला चांगले ओळखता. तुम्ही लोकांनी आधीच मला सावधगिरीचा इशारा द्यायला हवा होता. ये क्‍या आयटम है. 

कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com