सुनावणीची लिंक जुहीनेच व्हायरल केली अन् न्यायालय संतापलं...

न्यायालयाच्या व्हर्च्यूअल सुनावणीची लिंक सुनावणीशी संबंधित व्यक्तींनाच दिली जाते.
Juhi Chawla circulated the link of the hearing on social media
Juhi Chawla circulated the link of the hearing on social media

दिल्ली : अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) यांनी 5G नेटवर्कविरोधात याचिकेवर दोन दिवसांपूर्वी व्हर्च्युअल सुनावणी झाली होतीय पण सुनावणीदरम्यान अचानक एका व्यक्तीने जुही चावला यांच्या चित्रपटातील 'घुंघट की आड से...' हे गाणं गायला सुरूवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने आणखी दोनवेळा सुनावणीत अडथळे आण दोन गाणी म्हटली. त्यामुळं न्यायालयही चांगलचं संतापलं होतं. शुक्रवारच्या सुनावणी या मुद्यावरूनही न्यायालयाने जुही चावलाला दोषी धरलं आहे. (Juhi Chawla circulated the link of the hearing on social media )

शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने जुही चावलाची याचिका फेटाळून लावली. तसेच ही याचिका प्रसिध्दीसाठी केल्याचा ठपकाही न्यायालयाने ठेवला. पण यावेळी न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी सुनावणीदरम्यान आलेल्या अडथळ्यावरही जुहीवर ताशेरे ओढले. न्यायालयाच्या व्हर्च्यूअल सुनावणीची लिंक सुनावणीशी संबंधित व्यक्तींनाच दिली जाते. इतरांना ही लिंक दिली जात नाही.

मात्र, 2 तारखेला झालेल्या सुनावणीदरम्यान एका व्यक्तीने 'घुंघट की आड से...' हे गाणं गायला सुरूवात केली. त्यानंतर ही व्यक्ती व्हॅच्यूअल सुनावणीतून बाहेर पडली. पण पुन्हा जॅाईन होत त्याने 'लाल लाल होंठो पे...' हे गाणं सुरु केलं. तो पुन्हा बाहेर पडला. काही वेळाने तिसऱ्यांदा सुनावणीदरम्यान जॅाईन होत 'मेरी बन्नो की आयेगी बारात...' हे गाणं गायलं. तिन्ही गाणी जुही यांच्या चित्रपटातील आहेत. 

सुनावणीदरम्यान आलेल्या अडथळ्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यावरून आज न्यायालयाने जुही चावलानेही सोशल मीडियावर सुनावणीची लिंक व्हायरल केल्याचे सांगत दोषी धरले. त्यामुळं न्यायालयाच्या कामकाजात तीन वेळा अडथळे आले. दिल्ली पोलिसांनी संबंधित व्यक्तींचा ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 

जुहीने काय म्हटलं होतं याचिकेत?

आम्ही तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही. वायरलेस कम्युनिकेशनच्या क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या अनेक उत्पादनांचा आम्ही वापर करत आहोत. पण हा वापर करताना त्याचा अतिरेक होऊ नये, याकडेही लक्ष्य देण्याची गरज आहे. आपल्याच संशोधन व अभ्यासातून वायरलेस उत्पादने आणि मोबाईल टॅावरमधून निघणाऱ्या रेडिएशन घातक असल्याचे याचिकेत म्हटले होते. 

तसेच 5G तंत्रज्ञान हे नागरिक, पशु-पक्ष्यांसाठी सुरक्षित आहे, ही ग्वाही संबंधित विभागाने द्यावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. तसेच याच्या अंमलबजावणीचा अभ्यास करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यापूर्वी असा अभ्यास झाला नसल्यास सध्याच्या स्थितीत आणि भविष्याचा विचार करून पुरक अभ्यास होण्याची गरज आहे. लहान मुलांचे आरोग्य तसेच भविष्यात जन्माला येणाऱ्या मुलांचाही विचार करण्याची आवश्यकता असल्याची मागणी जुही यांनी केली होती. जुही चावला यांनी यापूर्वीही मोबाईल टॅावरमधून निघणाऱ्या रेडिएशनविरोधा आवाज उठवला आहे. पर्यावरणासाठी काही वर्षांपासून काम करत असून वायरलेस नेटवर्कविरोधात त्यांनी पहिल्यांदाच याचिका दाखल केली होती.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com