...तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात!

आज ४१ वर्षाने हॉकी संघाला कांस्यपदक मिळवता आले आहे.
...तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात!
Jayant Patil, Indian Hockey Team .jpg

मुंबई : भारतीय पुरुष हॉकी (Indian hockey team) संघाने ऑलिम्पिकमध्ये (Olympics४१) वर्षानंतर इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवले. भारताला हे पदक तब्बल ४१ वर्षांनंतर मिळाले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले. तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात. अभिनंदन टीम इंडिया अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भारतीय हॉकी संघाचे कौतुक केले आहे. (Jayant Patil praised the Indian hockey team) 

आज ४१ वर्षाने हॉकी संघाला कांस्यपदक मिळवता आले आहे. हॉकी संघाने मिळवलेले हे यश भारतीयांचा उर भरून आणणारे आहे. त्यामुळे संघावर कौतुकाचा वर्षांव केला जात आहे. ट्वीटरच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय हॉकी संघाला आपल्या वेगळ्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभवाला मागे टाकत ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम केला आहे. कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढय जर्मनीला भारताने पराभूत केले. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० मध्ये मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. मात्र, बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनी संघाला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले आहे. 

भारतीय संघ १-३ अशा पिछाडीव होता. त्यानंतर बलाढ्य जर्मनीला ५-४ असे पराभूत करुन पदकावर आपले नाव कोरले. सामना संपन्यासाठी फक्त सहा सेकंद बाकी असताना जर्मनीला पेनाल्टी कॉर्नरची संधी मिळाली होती. मात्र, पीआर श्रीजेशने गोल वाचवत भारताची विजयाची आशा कायम ठेवली. भारताने पदकावर नाव कोरल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या कुटुंबीयांकडून आनंद साजरा करण्यात येत आहे.   

Related Stories

No stories found.