"हे सरकार पुढचे चार वर्ष दिवाळी साजरी करणार.."  - Jayant Patil of NCP said that the government will move forward with good decisions. | Politics Marathi News - Sarkarnama

"हे सरकार पुढचे चार वर्ष दिवाळी साजरी करणार.." 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

हे सरकार पुढचे चार वर्ष दिवाळी साजरी करणार आहे. कोरोनामुळं लोक काही नाराज‌ झाली. पण त्यानंतर चांगले निर्णय घेऊन सरकार पुढे‌ जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. 

मुंबई : राज्य सरकाराला कोरोनामुळं जनतेची काळजी आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांनी हळूहळू सर्व काही सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रार्थनास्थळं उघडण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधक म्हणत असतील हा उशीर आहे, तर तसं काही नाही. काही निर्णय घेताना योग्य काळजी घ्यावी लागते. हे सरकार पुढचे चार वर्ष दिवाळी साजरी करणार आहे. कोरोनामुळं लोक काही नाराज‌ झाली. पण त्यानंतर चांगले निर्णय घेऊन सरकार पुढे‌ जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. 

"गेल्या वर्षी दिवाळीत राज्यात सत्तांतर झाले होते, मागील वर्षी अनेक अघोरी प्रयोग विरोधकांनी केले. परंतू आम्ही त्याला पुरून उरलो. जुनी थडगी उकरायचे किरीट सोमय्या यांनी बंद करावेत," असे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संजय राऊत म्हणाले, "विरोधकांनी राज्यात 'आँपरेश लोटस' सारखी अनेक आँपरेशन केली पण कुठेच खरचटल नाही. या राज्यात आता कोणतीच ऑपरेशन होणार नाही. महाविकास आघाडीने राज्यात एक वर्षाचा काळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. सरकार पाच वर्ष पूर्ण करेल."

"भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची दखल त्यांचा पक्षही घेत नाही. सोमय्याविषयी आम्ही बोलावं. असं काही महान कार्य किरीट सोमय्या यांनी केलेलं नाही. त्यांचा पक्ष देखील त्यांच्याकडे गंभीरपणे पाहत नाही. जुनी थडगी उकरायची किरीट सोमय्या यांनी बंद करावेत. आम्ही जर हे काम केलं तर सगळे सांगाडे त्यांचे सापडतील," असे राऊत यांनी सांगितले.

राऊत म्हणाले, "प्रत्येक वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात हे चांगलं आहे. पण काल दोन जवान शहीद झाले हेही लक्षात घ्यायला हवं. तेजस्वी यादव यांनी ज्याप्रकारे बिहारची भूमिका जिंकली आहे. तेच खरे योद्धे आहेत."

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची मते काय माहिती नाही पण हिंदुस्थान मधील नेत्यांबाबत अस बोलणं चुकीचं आहे त्यांना अधिकार दिला कोणी ? ओबामांनी एक वक्तव्य करायचं आणि त्याच राजकारण इथल्या नेत्यांनी केलं ते चुकीचे आहे. राहुल गांधी खूप चांगलं काम करीत आहेत. नरेंद्र मोदींबाबत ते जर हे बोलले तरिही माझी भूमिका हीच असेल, असे राऊत यांनी स्पष्ट केलं. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख