उद्धव ठाकरेंच्या पहाटेच्या फोनमुळे जयंतरावही गडबडले 

जयंत पाटील म्हणाले आमदारांची यादी ही अजित पवार यांच्याकडेच होती.
 Jayant Patil, jpg
Jayant Patil, jpg

मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यावेळी उमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ते सरकार काही तासात कोसळले. मात्र, त्यावरुन अजूनही राज्यात चर्चा होते. काही दिवसापूर्वी त्याच मुद्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्ये शाब्दीक वाद रंगला होता. (Jayant Patil comments on the morning swearing in ceremony) 

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. जयंत पाटील म्हणाले आमदारांची यादी ही अजित पवार यांच्याकडेच होती. ती त्यांनी तिकडे सादर केली, यामध्ये चोरुन नेण्याचा काहीच प्रश्न नाही. तो प्रसंग निघून गेला आहे. आम्ही आता अजितदादा यांच्यासोबत चांगले काम करत आहोत.  

पहाटेच्या शपथविधीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, दुसऱ्या दिवसी काँग्रेस पक्षासोबत चर्चेची बैठक होती. त्यामुळे मी रात्री उशीरा पर्यंत जागीच होतो. त्यामुळे मी सकाळी लवकर उठलो नाही. सकाळी ८.३० वाजता माझा फोन वाजत होता. मी झोपेतच फोन घेतला तो फोन उद्धव ठाकरे यांचा होता. मी फोन उचला आणि उद्धव ठाकरे म्हणाले जयंतराव तुमची शपथ झाली की नाही. तुमची शपथ झाली असेल. ते म्हणाले टीव्ही लावून बघा. त्यांनी झालेला प्रसंग मला थोडक्यात सांगितला. मी म्हणालो काही काळजी करुन नका. त्यानंतर मी टीव्ही चालू केला, असे पाटील यांनी सांगितले.   

मराठा आरक्षणावर पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबद्दल लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले, त्यानंतर राज्याने आरक्षण दिले मात्र, सर्वोच्च न्यायालयाने वेगळा निर्णय दिला. त्यामुळे मराठा समाजाची ही भूमिका आहे. की हा प्रश्न संसदेमध्ये मांडला पाहिजे. त्यामुळे मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी पंतप्रधानांना साकडे घातले की मराठा समाजाला न्याय देण्यासाठी संसदेत हा विषय मांडला गेला पाहिजे. 

ते म्हणाले २०१४ च्या आधी जेव्हा आमचे सरकार होते, त्याचवेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मराठा समाजाला आरक्षण देणे ही आमची सुरुवाती पासूनची भूमिका आहे. आज सर्वोच्च न्यायालयात जो निर्णय झाला त्याचा आम्हा सर्वानाच धक्का बसला आहे. रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा संसदेत हा विषय हाताळणे योग्य आहे. त्यामुळेच पंतप्रधानांची भेट घेतली. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com