सरकारचा मान राखत राष्ट्रवादीने घेतला महत्वाचा निर्णय - jayant patil announced to cancel ncp parisamvad yatra in maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

सरकारचा मान राखत राष्ट्रवादीने घेतला महत्वाचा निर्णय

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 जून 2021

कोरोना कमी होईल त्यावेळी परभणी जिल्ह्यातून ही यात्रा सुरू कjरु असे जयंत पाटील यांनी सांगितले.

हिंगोली :  राज्यात सरकारने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज हिंगोली येथे पत्रकार परिषदेत सांगितले.jayant patil announced to cancel ncp parisamvad yatra in maharashtra

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याचा दुसरा टप्पा मराठवाड्यातील तुळजापूर आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन २४ जूनपासून सुरू करण्यात आली. त्यात यवतमाळ मधील उमरखेड हा एक मतदारसंघ होता आणि पुढे २२ मतदारसंघात म्हणजे उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली हे चार जिल्हे आणि यातील २३ मतदारसंघाचा आढावा घेतल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. 

विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातही राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना बुथ कमिट्या स्थापन करण्याचे व संघटना मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पुरोगामी विचारांचा प्रसार अधिक करायला हवा त्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करण्याच्या सूचना दिल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. 

मराठवाडयात जिथे जिथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा गेली तिथे तिथे महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. शिवाय कार्यक्रमाच्या ठिकाणी भेटीही दिल्या. त्यामुळे महाविकास आघाडी किती भक्कमपणे काम करतेय हे यावरून स्पष्ट दिसतेय असेही जयंत पाटील यांनी सांगितले. 

महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये कसा समन्वय साधता येईल, याबाबतही संवाद दौर्‍यात चर्चा करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.  राष्ट्रवादीने पहिल्या टप्प्यात विदर्भाची संवाद यात्रा काढली होती. त्यामध्ये ८२ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यामध्ये विदर्भातील ११ जिल्ह्यातील ६२ मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. तर खान्देश जिल्ह्यातील २० मतदारसंघाचा आढावा घेतल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होईल त्यावेळी परभणी जिल्ह्यातून ही यात्रा सुरू करु, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख