शिवसेनेला मतदान करणं 'एमआयएम'च्या तीन नगरसेवकांना पडलं महागात.. पक्षाकडून निलंबित...

नगरसेवक रियाझ बागवान, सईदा शेख, सुन्ना राजू देशमुख यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रफिक कादरी यांनी नोटीस बजावली आहे.
mim20.jpg
mim20.jpg

जळगाव : जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता शिवसेनेनं खालसा करून राज्यात मोठे सत्तांतर केले आहे, यात सेनेला एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी मतदान केले. एमआयएमने तिघांना निलंबित केले आहे. जळगाव महापालिकेत महापौर व उपमहापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 27 नगरसेवक फुटले त्यांनी शिवसेनेला साथ दिली. यात महापालिकेतील एमआयएमच्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेला मतदान केले त्यामुळे महापालिकेत शिवसेनेचा महापौर व भाजप बंडखोर गटचा उपमहापौर झाला. महापालिकेवर असलेली भाजपची सत्ता संपुष्टात आली. या सत्तातराने संपूर्ण महाराष्ट्र खळबळ उडाली. एमआयएमने मात्र शिवसेनेला साथ देणाऱ्या तीन नगरसेवकांवर कारवाई करीत त्यांना निलंबित केले आहे. 

नगरसेवक रियाझ बागवान, सईदा शेख, सुन्ना राजू देशमुख यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रफिक कादरी यांनी नोटीस बजावली आहे. तिघांना कारणे दाखवा, असे आदेश देण्यात आले आहे. तो पर्यंत तिघे पक्षातून निलंबित असतील असेही त्यांना कळविण्यात आले आहे. 

उद्या (ता. 21) औरंगाबाद येथे त्यांना बोलावण्यात आले आहे. त्यांनी आपले म्हणणे पक्षाच्या नेत्यांसमोर मांडावे, असे सांगण्यात आले आहे. पक्षाचे महापालिकेतील गटनेते रीयाज बागवान यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पक्षाची आपल्याला नोटीस आली आहे. आपण पक्ष नेत्यांसमोर म्हणणे मांडणार आहोत. आम्ही प्रभागाच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. कारण गेल्या अडीच वर्षात प्रभागाचा कोणताही विकास झाला नव्हता. आता आम्हाला सेना नेत्यांकडून हमी मिळाली आहे.

जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाला व विशेषतः माजी मंत्री गिरीश महाजन यांना धक्का देत शहराच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने हा धक्का बसला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची खेळी यशस्वी ठरली आहे. शिवसेनेने निवडीअगोदरच विजयाचे फलक लावले होते. मतदानात शिवसेनेला ४५ तर भाजपच्या प्रतिभा कापसेंना केवळ तीस मते पडली. एमआयएमच्या या तीन नगरसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com