आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून - ITI admission process from today | Politics Marathi News - Sarkarnama

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

आयटीआयमध्ये प्रवेशासाठी १४ ऑगस्‍टपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. 

नाशिक : दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था (आयटीआय) मध्ये प्रवेशाकरिता वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन स्‍वरूपात अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून (ता.१) सुरू होत आहे. इच्‍छुक पात्र उमेदवारांना शासकीय व खासगी आयटीआयमध्ये प्रवेशासाठी १४ ऑगस्‍टपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. 

प्रवेश अर्जाकरिता अराखीव प्रवर्गातील उमेदवारास दीडशे रुपये, राखीव प्रवर्गातील उमेदवारास शंभर रुपये, राज्‍याबाहेरील उमेदवार तीनशे तर अनिवासी भारतीय उमेदवारास पाचशे रूपये शुल्‍क असेल. अर्ज भरल्‍यानंतर प्रवेश अर्ज शुल्‍क भरलेल्‍या उमेदवारांचाच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाईल. उमेदवाराने एकच अर्ज भरावा.

एकापेक्षा जास्‍त अर्ज भरल्‍यास अशा उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील व निवड झालेल्‍यास किंवा प्रवेश दिला गेल्‍यास त्‍याचा प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रत्‍येक फेरीत निवड झालेल्‍या उमेदवारांना निवडपत्र (अलॉटमेंट लेटर) ऑनलाइन उपलब्‍ध करून दिले जातील. यासाठी उमेदवारांनी आपल्‍या अकाउंट लॉगइनवरुन निवडपत्राची प्रत काढून घ्यावी. निवड झालेल्‍या आयटीआयमध्ये प्रवेशासाठी दिलेल्‍या वेळापत्रकानुसार उपस्‍थित राहावे, असे स्‍पष्ट करण्यात आले आहे. प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया सप्‍टेंबर अखेरपर्यंत पार पडेल.

 

  1. -आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया अशी (पहिल्‍या फेरीअखेरपर्यंत)
  2. -ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याची मुदत १ ते १४ ऑगस्‍ट
  3. -पहिल्‍या फेरीसाठी आयटीआय विकल्‍प व प्राधान्‍य सादर करणे २ ते १४ ऑगस्‍ट
  4. -प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे १६ ऑगस्‍ट, ११ वा.
  5. -गुणवत्ता यादीबाबत हरकती, प्रवेश अर्जातील बदल १६, १७ ऑगस्‍ट
  6. -अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार १८ ऑगस्‍ट
  7. -पहिल्‍या फेरीसाठी निवड यादी प्रसिद्ध होणार २० ऑगस्‍ट
  8. -निवड झालेल्‍या उमेदवारांची पडताळणी व प्रवेश कार्यवाही २१ ते २६ ऑगस्‍ट
  9. -खासगी आयटीआयमधील संस्‍थास्‍तरावरील प्रवेश १६ ऑगस्‍टपासून
  10.  

 
अशी आहे पुढील फेऱ्यांची प्रक्रिया

दुसऱ्या फेरीसाठी व्‍यवसाय व संस्‍थानिहाय विकल्‍प व प्राधान्‍य सादर करण्यासाठी २१ ते २७ ऑगस्‍ट मुदत असेल. निवड यादी ३० ऑगस्‍टला जाहीर केली जाणार असून, प्रवेशासाठी ३ सप्‍टेंबरपर्यंत संधी असेल. तिसऱ्या फेरीसाठी ३ ते ४ सप्‍टेंबरदरम्‍यान पर्याय नोंदविता येणार असून निवड यादी ७ सप्‍टेंबरला जारी केला जाईल. प्रवेशासाठी ८ ते ११ सप्‍टेंबरपर्यंत मुदत असेल.

Edited  by : Mangesh Mahale 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख