चंद्रकांत पाटलांना घेराव.. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे न देताच परत

निवडणुकीपूर्वी माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजकरांना विकासाची स्वप्ने दाखविली होती. मात्र, नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे न देताच तेथून परत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली.
2download_47.jpg
2download_47.jpg

सांगली : मिरज शहरात विविध विकास कामाच्या उद्धघाटनासाठी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आले होते. रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड परिसरात गेले पंधरा दिवस ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. चंद्रकांतदादा पाटील किरण हॉटेल ते रेल्वे स्टेशन या रस्त्याच्या ट्रीमिक्स रस्त्याच्या उद्धघाटन करण्यासाठी या ठिकाणी आले होते. रिक्षा चालकांनी त्यांना या परिसराची पाहणी करण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी नकार देत घाईगडबडीत ड्रेनेजच्या घाणीच्या वासातच उद्धघाटन आवरून येथून निघून गेले.

यावेळी रिक्षा चालक आणि नागरिकांनी त्यांचा सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचा निषेध व्यक्त केला. तर रस्त्यावर बसून धरणे आंदोलन केले. गेल्या पंधरा दिवसापासून मिरजेत ठिकठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर साचले आहे. तसेच शहरातील सर्वच रस्ते खराब झाले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाचे मिरजेच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.

सांगली महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. निवडणुकीपूर्वी माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजकरांना विकासाची स्वप्ने दाखविली होती. मात्र, नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे न देताच तेथून परत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली.
 

हेही वाचा : 'ईस्टन फ्री वे' ला "माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे नाव द्या" 

मुंबई : पुर्व मुक्त मार्गाला  (Eastern Free Way)   माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग, बंदरे, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अस्लम शेख यांनी ही मागणी केली आहे. अस्लम शेख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, मुंबईची वाहतुक कोंडी लक्षात घेत महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या पुर्व मुक्त मार्गाची संकल्पना मांडली. विलासराव देशमुख यांच्यामुळेच हा मार्ग तयार होऊ शकला.या रस्त्याची लांबी १६.८ किलोमीटर असून दक्षिण मुंबईतील 'पी डीमोलो रोड पासून ते चेंबुर येथील पुर्व द्रुतगती मार्गास हा मार्ग जोडतो. सध्या हा रस्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या रस्त्यास माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देणं ही त्यांच्या कार्याची पोहच पावती असेल असंही अस्लम शेख यांनी पत्रात  शेवटात लिहिलय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com