नाराज एकनाथ खडसेंना गिरीश महाजनांकडून निमंत्रण... - Invitation from Girish Mahajan to Eknath Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

नाराज एकनाथ खडसेंना गिरीश महाजनांकडून निमंत्रण...

कैलास शिंदे
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

महाजन म्हणाले, मी खडसे यांच्याशी फोनवर बोललो आहे. त्यांना निमंत्रण दिले आहे.

जळगाव : राज्याचे विरोधी यांच्या पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जामनेर येथील कार्यक्रमास एकनाथ खडसे यांना निमंत्रण दिले आहे. अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली त्यामुळे या कार्यक्रमास खडसे उपस्थित राहणार काय याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.                                               

भारतीय जनता पक्षातर्फे आज महिला आघाडतर्फे राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी गिरीश महाजन उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,राज्यातील शासन निष्क्रिय झाले आहे.महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्याच्या निषेधार्थ आज पक्षातर्फे राज्यभर आंदोलन करीत आहोत. जळगाव येथेही आम्ही आंदोलन केले.                    

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले की या बाबत आपल्याला काहीही माहिती नाही. परवा मुंबईत पक्षाची बैठक झाली. त्यावेळी ते उपस्थित होते. त्यामुळे ते पक्ष सोडून जातील, असे आपणास वाटत नाही.

जामनेर येथे उद्या (ता. १३) देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हॉस्पिटलची उद्घाटन होत आहे. त्या कार्यक्रमास खडसे यांना निमंत्रण दिले आहे का ? या प्रश्नाला उत्तर देताना महाजन म्हणाले, मी खडसे यांच्याशी फोनवर बोललो आहे. त्यांना निमंत्रण दिले आहे. या शिवाय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना तसेच सर्व पक्षाचे आमदार नेते यांना आपण निमंत्रण दिले आहे. एकनाथराव खडसे यानी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे त्यामुळे ते या कार्यक्रमास उपस्थित राहणार काय याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांच्या हट्टामुळे मेट्रो कारशेडची जागा बदलली.. 

मुंबई : मुंबई मेट्रोच्या कार शेडसाठी आरेची जागा घेण्याचा निर्णय शासनाने रद्द केली असून आता कांजूर येथे ही कारशेड होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ही संपूर्ण जागा एकही रुपया न आकारता मेट्रोला देण्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांना महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आता माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट.. करोडो रुपये वाया जाणार, नवीन परवानग्या कधी मिळतील व मिळतील की नाही माहीत नाही कारण ती जमीन भुसभुशीत (खारफुटी सारखी) आहे. किमान ५ हजार कोटी या नवीन उभारणीसाठी लागणार... आधीचे पैसे गेले, असं टि्वट निलेश राणे यांनी करीत मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला आहे. मुंबई मेट्रोच्या कार शेडसाठी आरेची जागा घेण्याचा निर्णय शासनाने रद्द केला असून आता कांजूर येथे ही कारशेड होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली.

Edited  by : Mangesh Mahale  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख