आमदारकी जाण्याची राजेश टोपेंना होती धास्ती..पण झाले मंत्री

विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आज एकवर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्ताने चर्चेत असलेल्या विधानसभा मतदारसंघाचा घेतलेला हा आढावा
राजेश टोपे1.jpg
राजेश टोपे1.jpg

घनसावंगी : मागील वीस वर्षापासून प्रतिनिधित्व करीत असलेले आमदार राजेश टोपे यांना घनसावंगी विधानसभा निवडणूकीत शिवसेनेच डॉ. हिकमत उढाण यांनी कडवी झुंज दिली. उढाण यांनी टोपे यांच्या तोडीस तोड यंत्रणा उभी केली होती.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत राजेश टोपे यांना 286 मतांची आघाडी वगळता त्यानंतर उढाण यांनी 21 व्या  फेरीपर्यत 2491 मतांची आघाडी मिळवली होती. त्यामुळे ते विजयापर्यत पोहचतील असे त्यांच्या समर्थकांना वाटले परंतु 22, 24, 25 व्या फेरीत टोपे यांचे जन्म गाव पाथरवाला बुद्रूक, वाळकेश्‍वर, आपेगाव, बळेगाव, साष्ट पिंपळगाव, महाकाळा या त्यांच्या समर्थ साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावांनी त्यांचा विजय सुकर करून त्यांनी निसटता विजय संपादन केला.  

25 फेरी अखेर उढाण यांना 1 लाख 3 हजार 194 मते मिळाली, त्यात पोस्टल मते 246 मते मिळाली असे एकूण 1 लाख 4 हजार 440 मते तर राजेश टोपे यांना एक लाख सहा हजार 187 मते मिळाली. त्यात पोस्टल मते 475 असे एकूण  एक लाख सात हजार 849 मते मिळाली असून 3409 मतांनी आघाडी घेत त्यांनी विजय संपादन केला.

वडीगोद्री, शहागड, अरगडेगव्हाण येथील मतदान केंद्राच्या ईव्हीएममध्ये तांञीक अडचण आल्याने या मतदान केंद्राच्या व्हीव्हीपँटची मोजणी करण्याचे निश्‍चीत करण्यात आले होते. त्याचबरोबर तीन मतदान केंद्राच्या ठिकाणी असलेले मते ही विजयी उमेदवारांच्या आघाडीच्या कमी असल्याने तीन मतदान केंद्राचीं मतमोजणी करण्यात आली नाही. यांचबरोबर वंचित आघाडीच्या विष्णू शेळके यांनी 9293 मते मिळाली आहे. 

इतर दहा उमेदवार हजार मतेही मिळू शकले नाही. मतमोजणी केंद्रावर सकाळ पासून युती व महाआघाडीचे उमेदवार व कार्यकर्त्या मतमोजणी केंद्रबाहेर ठाण माडून बसले होते. सकाळी दिवसभर उढाण यांची आघाडी ध्वनिक्षेपकावर फेरीनिहाय निकाल जाहीर होताच मतमोजणी केंद्राबाहेर थांबलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. परंतू टोपे यांच्या समर्थ साखर कारखान्याच्या पट्यात व त्यांच्या गावातून त्यांना मोठे मताधिक्य मिळाले. या राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी वाढताच युतीच्या कार्यकत्यानी घरी परतले राञी उशीरा राजेश टोपे यांचा विजय घोषीत करण्यात आला. अशा पद्धतीने राजेश टोपे हे माजी आमदार होण्याऐवजी ते राज्याचे आरोग्यमंत्री झाले. 

या निवडणूकीत स्थानिक स्वराज्य संस्था, समर्थ साखर कारखाने, समर्थ बॅक, सर्व सहकारी संस्था, शिक्षण संस्था, कार्यकर्त्याची मोठी फळी, वीस वर्षातील विकासकामे असे अनेक पाठबळ असताना राजेश टोपे यांना निवडणूकीत शेवटच्या फेरीपर्यत विजयासाठी झुंजावे लागले तर दुसरीकडे मागील पराभवानंतर उढाण यांनी शिवसेनेला ताकत देवून या भागात कार्यालयासह जनसंपर्क वाढविला, त्याचबरोबर वैयक्तिक मदत, विविध रुग्णाचे शस्त्रक्रिया त्यांनी मुंबई घेऊन जाऊन केल्या त्यामुळे त्यांच्या विषयी मतदारांत आस्था निर्माण झाली होती.

यातून त्यांनी विजयापर्यत प्रवास सुकर केला ही चर्चा सर्वत्र आहे.  लोकसभा निवडणूकीत 1 लाख 89 हजार 900 मतदान झाले होते. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूकीत दोन लाख 28 हजार 944 मतदान झाल्यांने मतदानांचा टक्का वाढला यातून पहिल्यांदाच ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसारखे मतदान करण्यासाठी कार्यकर्त्यानी प्रयत्न केल्यांने मतदानांची टक्केवारी वाढली यांवर सर्वत्र चर्चा झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com