केंद्रीय आरोग्यमंत्री तोंडावर आपटले! गुजरातसह भाजपच्या राज्यांनीच केले हात वर - Inoculate people will start once it receives a vaccine doses says bjp governments | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

केंद्रीय आरोग्यमंत्री तोंडावर आपटले! गुजरातसह भाजपच्या राज्यांनीच केले हात वर

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 एप्रिल 2021

केंद्रीय आरोग्यमंत्री डॅा. हर्षवर्धन यांनी राज्यांना लशींचा पुरेसा पुरवठा केला जात असल्याचा दावा केला आहे. 

नवी दिल्ली : भारतात एक मेपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्यामध्ये 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॅा. हर्षवर्धन यांनी राज्यांना लशींचा पुरेसा पुरवठा केला जात असल्याचा दावा केला आहे. पण महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी लशींचा पुरेसा साठा नसल्याने तिसरा टप्पा सुरू करता येणार नाही असे म्हटले आहे.

डॅा. हर्षवर्धन यांचा दावा आता भाजपच्या राज्यांनीच खोडून काढला आहे. गुजरातसह हिमाचल प्रदेश, हरयाणाच्या सरकारांनी आपल्याकडे लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पुरेसा साठा नसल्याचे म्हटले आहे. लस उत्पादक कंपन्यांकडून पुरवठा झाल्यानंतरच 18 ते 45 वयोगटासाठी लसीकरणाला सुरूवात करता येईल, असेही या राज्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लशींचा तुटवडा नसल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना घरचा आहेर मिळाला आहे. 

गुजरात सरकारने म्हटलं आहे की, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू करायचे आहे. पण कंपन्यांकडून लशीचे पुरसे डोस मिळाल्यानंतरही हे सुरू केले जाईल. तर हिमाचल प्रदेश सरकारनेही लशींचा अॅार्डर दिल्याचे सांगत सरकारी लसीकरण केंद्रात ही अॅार्डर मिळाल्यानंतरच संबंधितांना लस दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे. 

हरयाणा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरयाणामध्ये लशींचा तुटवडा आहे. पण ही परिस्थिती फक्त हरयाणामध्ये नसून संपूर्ण देशातच आहे. त्यामुळे राज्याला अपेक्षेप्रमाणे लस मिळत नाही. त्यामुळे लसीकरणावर परिणाम झाला आहे. 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी आम्ही अॅार्डर दिली आहे. 

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॅा. हर्षवर्धन म्हणाले, देशात सध्या विविध राज्यांत मिळून एक कोटींहून अधिक डोस शिल्लक आहेत. पुढील 2-3 दिवसांत आणखी पुरवठा केला जाणार आहे. राज्यांच्या क्षमतेनुसार त्यांना पुरवठा केला जात आहे. दररोज लशींचा पुरवठा सुरू आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख