४१ वर्षांनी भारतीय हॉकी टीमने घडवला इतिहास 

उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभवाला मागे टाकत ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम केला आहे.
 Indian hockey team .jpg
Indian hockey team .jpg

भारतीय पुरुष हॉकी (Indian hockey team) संघाने ऑलिम्पिकमध्ये (Olympics४१) वर्षानंतर इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवले. भारताला हे पदक तब्बल ४१ वर्षांनंतर मिळाले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल. (The Indian hockey team made history after 41 years) 

उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभवाला मागे टाकत ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम केला आहे. कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढय जर्मनीला भारताने पराभूत केले. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० मध्ये मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. मात्र, बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनी संघाला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले आहे. 

भारतीय संघ १-३ अशा पिछाडीव होता. त्यानंतर बलाढ्य जर्मनीला ५-४ असे पराभूत करुन पदकावर आपले नाव कोरले. सामना संपन्यासाठी फक्त सहा सेकंद बाकी असताना जर्मनीला पेनाल्टी कॉर्नरची संधी मिळाली होती. मात्र, पीआर श्रीजेशने गोल वाचवत भारताची विजयाची आशा कायम ठेवली. भारताने पदकावर नाव कोरल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या कुटुंबीयांकडून आनंद साजरा करण्यात येत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com