कोविड  मृत्यूच्या आकडेवारीत ठाकरे सरकारकडून लपवाछपवी...  - Incorrect information from Thackeray government in Kovid death statistics | Politics Marathi News - Sarkarnama

कोविड  मृत्यूच्या आकडेवारीत ठाकरे सरकारकडून लपवाछपवी... 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 एप्रिल 2021

कोविड  मृत्यूच्या आकडेवारीत ठाकरे सरकार लपवाछपवी करीत आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. 

मुंबई : ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या हाफकिन संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन ५६५ मध्ये  खरेदीचा निर्णय घेतला. तर शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकने  या इंजेक्शनची खरेदी  १५६८ रुपयात केली. एवढी तफावत का, यांची चैाकशी केली पाहिजे.  ठाकरे सरकार स्वतःच ब्लॅकमार्केटिंग करीत आहेत, असे सोमय्या यांनी सांगितले. कोविड  मृत्यूच्या आकडेवारीत ठाकरे सरकार लपवाछपवी करीत आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. 

सोमय्या म्हणाले की, वसई विरार महानगरपालिकेत कोरोनाबळी लपवत असल्याचा धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या १३ दिवसात २०१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला मात्र पालिका केवळ २३ मृत्यूंची नोंद दाखवत आहे. ठाणे महानगरपालिकेत स्मशानभूमित ३०९ कोरोना रूग्णांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे, मात्र ठाणे पालिका प्रशासन ५७ जणांची नोंद दाखवत आहेत. महानगरपालिका आयुक्त माहित देतात, आम्ही फक्त सरकारी रुग्णालयातील आकडेवारी घेतली आम्ही खासगी रूग्णालयातील आकडेवारी घेतली नाही, ही आकडेवाडी आल्यानंतर  आम्ही दुरूस्त करू.

मृतकांच्या आकड्यातही गौडबंगाल..प्रशासन-स्मशानभूमीच्या माहितीत तफावत
अकोला : गेल्या महिन्याभरात राज्यात मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यात मृतांचा आकडा देखील वाढत असल्यामुळे प्रशासनासमोर मृत्यूदर कमी करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले  आहे.  दररोज रुग्णांचा बळी जात आहे, मात्र प्रशासनाकडून दर्शविण्यात येणारी मृतकांची संख्या आणि स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्या जाणाऱ्या मृतकांच्या संख्येत बुधवारी लक्षणीय तफावत दिसून आली. याची शहानिशा केली असता, मृतकांच्या आकड्यात गौडबंगाल असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. जिल्हा प्रशासनाकडून दररोज जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली जाते. त्यानुसार काल दिवसभरात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली, परंतु दुपारपर्यंत स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १४ जणांवर अत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीत आणि स्मशानभूमीतून मिळालेल्या मृतांच्या आकडेवारीत मोठी तफावत आढळली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख