भीमा कोरेगावच्या इतिहासाचा शालेय पाठयपुस्तकात समावेश करा... - Include the history of Bhima Koregaon in the school textbook  | Politics Marathi News - Sarkarnama

भीमा कोरेगावच्या इतिहासाचा शालेय पाठयपुस्तकात समावेश करा...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

भीमा कोरेगाव लढाईच्या इतिहासाचा शालेय पाठयपुस्तकात समावेश करा, या मागणीसाठी शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे  रामदास आठवले यांनी  सांगितले.   

पुणे : देशात समता प्रस्थापित झाली पाहिजे. दलित आणि सवर्ण यांच्यात एकजूट  झाल्यास देशाचा वेगाने विकास होईल असे सांगत भीमा कोरेगाव लढाईच्या इतिहासाचा शालेय पाठयपुस्तकात समावेश करावा. या मागणीसाठी शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सांगितले.   
  
भीमा कोरेगाव येथे शौर्यदिनानिमित्त ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी रामदास आठवले बोलत होते. भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाच्या परिसराचा विकास करण्याचा आराखडा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर झाला होता. त्यानुसार या परिसराचा विकास करावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

नवीन वर्षात रिपब्लिकन पक्ष मजबूत करणे हाच आमचा संकल्प असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष, रिपब्लिकन पक्ष या अर्थाने मी रिपब्लिकन ही आमची घोषणा आहे, असे रामदास आठवले यांनी आज जाहीर केले. यावेळी रिपाइंचे परशुराम वाडेकर, आसित गांगुर्डे, सूर्यकांत वाघमारे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, आयुब शेख, शैलेश चव्हाण, संघमित्रा गायकवाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : सरकारकडे कोणताच ठोस प्लॅन नाही..आंबेडकरांची टीका
पुणे : राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन नाही, असा प्लॅन असता तर कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून आपण बाहेर पडलो असतो. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काहीच प्लॅन नाही. कोणते निर्णय घ्यायला पाहिजे, हे सरकार ठरवतच नाही. जनतेने सांगितल्यावर सरकार फक्त आदेश काढण्याचे काम करत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज केली. कोरेगाव भीमा येथे प्रकाश आंबेडकर यांनी आज विजयस्तंभाला अभिवादन केले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात आज बोलणं योग्य ठरणार नाही. कोरोनानंतर फार मोठा बदल होईल, असे मला वाटत नाही. मुंबई किंवा पुण्यातील लोकल आतापर्यंत सुरु व्हायला हवी होती. सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही असे दिसत आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे दरवर्षी होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अनुयायांना घऱातूनच अभिवादन करण्याचे आवाहन केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख