विमानतळ ; शरद पवारांच्या विधानाने चाकणकरांच्या आशा पल्लवीत ! - Important statement of Sharad Pawar regarding Purandar Airport | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

विमानतळ ; शरद पवारांच्या विधानाने चाकणकरांच्या आशा पल्लवीत !

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जुलै 2021

विमानतळासाठी आपल्याकडे तीन पर्याय आहेत.

माळशिरस (पुणे) : पुरंदर विमानतळाबाबत  Purandar Airport राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी केलेल्या विधानामुळे चाकणकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पुरंदर तालुक्यातील विमानतळ विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काल बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी पवार यांनी हे विधान केलं. Important statement of Sharad Pawar regarding Purandar Airport

शरद पवार म्हणाले, ''पुरंदर विमानतळाच्या जागेबाबतचा तांत्रिक अहवाल आलेला नाही. त्यामुळे विमानतळासाठी पुरंदरची जागा अजून निश्चित केलेली नाही. विमानतळासाठी आपल्याकडे तीन पर्याय आहेत. जनतेच्या मागणीनुसार खेड, चाकणच्या जागेचा विचार करावा लागेल. अजून विमानतळाची जागा निश्चित झाली नाही. शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही. तीन जागांची पाहणी करुन माहिती जमा केली जात आहे.''

विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश मुळीक म्हणाले, ''विमानतळासाठी जागा देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. आमच्या जागेचा विमानतळासाठी विचार करु नये, अशी विनंती शरद पवार यांच्याकडे केली आहे." नवीन जागेविषयी प्रशासनाने पुरवलेल्या खोट्या माहितीचे पुरावे यावेळी संघर्ष समितीने पवारांसमोर मांडले. 

यावेळी पुरंदर विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश मुळीक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, संतोष कोलते, उद्धव भगत, शशीभाऊ गायकवाड, हरिदास खेसे, चंद्रकांत चैांडकर,  किरण सांळुखे आदी उपस्थित होते.  

पुरंदर तालुक्‍यातील पारगाव परिसरातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्‍टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. केंद्र आणि राज्य सरकार, तसेच एअरपोर्ट ॲथॉरिटी, संरक्षण मंत्रालयासह सर्व परवानग्या या जागेसाठी मिळाल्या. मात्र  सात गावांतील गावकऱ्यांनी आणि स्थानिक आमदार संजय जगताप यांनी विमानतळास विरोध दर्शविला होता. यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांनी पर्यायी जागांचा विचार करावा, अशा सूचना मध्यंतरी प्रशासनाला दिल्या आहेत. हे विमानतळ यापूर्वी चाकण परिसरात होणार होते. 

पुरंदर तालुक्यातील रिसे, पिसे, राजुरी, नायगाव, पांडेश्वर तसेच बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, आंबी खुर्द या गावांच्या परिसरात विमानतळ होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. विमानतळासाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी द्यायच्या नाहीत ही या गावातील शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे.

प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जागा देण्यास पुरंदर तालुक्‍यातील स्थानिकांकडून तीव्र विरोध होत आहे. या पार्श्‍वभूमीवर हे विमानतळ पुरंदरऐवजी खेड तालुक्‍यातील 'एसईझेड'च्या जागेत करण्यात यावे, अशी मागणी खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी राज्य सरकारकडे केली. 

मनसेच्या व्हिडिओनंतर नांगरे पाटलांनी उपायुक्तांचे टोचले कान!

मुंबई : कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण त्याची कडक अंमलबजावणी केली जात नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे Sandeep Deshpande यांनी दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. देशपांडे यांनी एक व्हिडिओ टि्वट करीत ठाकरे सरकारवर खोचक टीका केली होती. या व्हिडिओची दखल मुंबई पोलिससह आयुक्त विश्वास नांगरे पाटील Vishwas Nangre Patil यांनी घेतली आहे. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख