#Maratha Reservation : स्थगिती उठविण्याबाबत तूर्तास नकार.. - Important hearing today on Maratha Reservation Supreme Court  | Politics Marathi News - Sarkarnama

#Maratha Reservation : स्थगिती उठविण्याबाबत तूर्तास नकार..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 डिसेंबर 2020

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याबाबत तूर्तास नकार देण्यास आला आहे.

मुंबई : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याबाबत तूर्तास नकार देण्यास आला आहे. यापुढील सुनावणी जानेवारीत होणार आहे. याबाबत आज महत्वाची सुनावणी होती. सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली. या निर्णयाकडे मराठा समाजाचे लक्ष लागले होते.

ता. 9 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली होती. ही स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारनं चार वेळा अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी झाली.

घटनापीठाच्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले होते. न्या. अशोक भूषण, न्या. नागेश्वर राव, न्या. अब्दुल नजीर, न्या. हेमंत गुप्ता, न्या. रवींद्र भट यांचे हे घटनापीठ आहे.

ता. 4 डिसेंबर रोजी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याच्या अर्जासाठी खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे.खंडपीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे. मराठा आरक्षणाअंतर्गत 2020 आणि 2021 मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

मराठा समाजाला केंद्र सरकारच्या आर्थिक निकषाचे (EWS) आरक्षणाचे लाभ त्वरित लागू करावे; अन्यथा संभाजी ब्रिगेड राज्यभरात आंदोलन करणार असल्याचा इशारा देत "मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना टार्गेट केले जात असून ते चुकीचे आहे. वास्तविक आर्थिक निकषावरील आरक्षणासाठी पवारांनी प्रमाणिकपणे प्रयत्न केले होते', असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी नुकतेच सांगितलं होत. "देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षणाचा टक्का 50 पेक्षा वाढवून मराठा आरक्षणाबाबत फसवणूक केली आहे', असा आरोपही गायकवाड यांनी केला आहे. 

अखिल भारतीय मराठा महासंघाचे जवळपास 40 वर्षे अध्यक्ष असणाऱ्या ऍड. शशिकांत पवार यांनी "शरद पवार यांनी ठरवले असते, तर मराठा समाजाला आरक्षण देता आले असते, परंतु त्यांनी मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केले. त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही' असा आरोप केला होता. त्या आरोपांना गायकवाड यांनी पत्रकार परिषदेद्वारे उत्तर दिले आहे. 

"मराठा आरक्षण (SEBC) कायदेशीर पातळीवर टिकेल, अशी शक्‍यता वाटत नाही, त्यामुळे EWS चा लाभ मिळावा, अशी मागणी करताना गायकवाड म्हणाले, "मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाकडून आता जे आंदोलन करत आहेत, ते भाजपच्या नेतृत्वाखाली होत आहे. मराठा समाजावर शरद पवार यांनी अन्याय केला, या शशिकांत पवारांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही,' असे गायकवाड यांनी नमूद केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख