#मराठा आरक्षण : रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू.. - An important decision of the government is to suspend the Maratha reservation | Politics Marathi News - Sarkarnama

#मराठा आरक्षण : रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

मुंबई : मराठा समाजातील मुलांसाठी शैक्षणिक प्रवेशाबद्दल सरकारचा महत्त्वाचा निर्णय घेतसा आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. मात्र, त्यांना प्रवेश देण्यात आलेले नाहीत, अशा SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे.
 
सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या दरम्यान, न्यायाधीश संभाजी शिंदे व न्यायाधीश माधव जामदार यांच्या खंडपीठाने आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग बद्दल महत्त्वपूर्ण निर्णय दिला. मराठा समाजातील युवकाना नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. 

पाच न्यायाधीशांच्या या खंडपीठाने जोपर्यंत मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत मराठा समाजाला एसईबीसीमधून प्रवेश देऊ नका, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. त्यामुळे कराडच्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना तहसीलदाराकडे  वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ईडब्लूएसअंतर्गत प्रवेश मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. पण, तहसीलदारांनी ही मागणी फेटाळून लावली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

हेही वाचा : म्हणून भाजपचे नेते काड्या पेटवतात..  

मुंबई : " चंद्रकांतदादा पाटील यांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडली...आम्ही स्वप्नं पाहण्याचं काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसं आहोत. 105 आमदार असताना सरकार बनवता आलं नाही, हे भाजप नेत्याचं खरं दुखणं आहे, म्हणून भाजपचे नेते सारख्या काट्या पेटवतात.." अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, "विरोधकांना नेहमी कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी  'सरकार पडणार पडणार ' असं म्हणावंच लागतं. कार्यकर्त्यांना कायम गाजर दाखवावं लागतं. शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांनी ही महाविकास आघाडी निर्माण केली आहे, यांचे आशीर्वाद आहे, तोपर्यंत सरकार मजबूत आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख